बीड (रिपोर्टर) धुळे-सोापूर राष्ट्रीय महामार्गावरून धावणार्या बस या बायपास महामार्गाने जाऊ लागल्या. चौसाळा बसस्थानकातील प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. अनेक बस चौसाळा बसस्थानकात येत नसल्याबाबत आगारप्रमुखांना ग्रामस्थांनी निवेदन दिले असून सर्व बस चौसाळा बसस्थानकातून जाव्यात, अशी मागणी केली आहे.
आगारप्रमुख यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अनेक बस या चौसाळा बसस्थानकात न येता पारगाव बसस्थानक मार्गे बीडच्या दिशेने जात आहेत. त्यामुळे विद्यार्थी, नागरिकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी बीडमध्ये जातात. त्यांच्याकडे पास काढलेले आहेत मात्र बसच वेळेवर येत नाही तर अनेक बस पारगाव बायपास मार्गे जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. सर्व बस या चौसाळा बसस्थानकातूनच पुढे जावेत अशी मागणी चौसाळा ग्रामस्थांसह प्रदीप बांगर आदींनी केली आहे.