• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home व्यापार
Trending

दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

by beedreporter
May 25, 2022
Reading Time: 1 min read
0
money 2022
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

कोरोना महासाथीच्या आजाराने जगभरात हाहा:कार उडला होता. कोरोना महासाथीमुळे कोट्यवधी कुटुंबावर परिणाम झाला. कोरोना महासाथीमुळे जगभरात आर्थिक विषमता वाढली. कोरोनाच्या दोन वर्षाच्या काळात अब्जाधीशांच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली. मागील 23 वर्षात त्यांची संपत्ती इतक्या प्रमाणात वाढली नव्हती, असा दावा ऑक्सफॅम इंटरनॅशनलच्या  (Oxfam International) अहवालात करण्यात आला आहे.

ऑक्सफॅम इंटरनॅशनलने आपल्या अहवालात म्हटले की, कोरोना महासाथीच्या 24 महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर संपत्ती वाढली. मागील 23 वर्षांमध्ये संपत्तीमध्ये इतकी वाढ कधीच झाली नव्हती.

जगात सध्या 2668 अब्जाधीश असल्याचे  ऑक्सफॅम इंटरनॅशनलच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या अब्जाधीशांकडे 12.7 ट्रिलियन डॉलर म्हणजे जवळपास 984.95 लाख कोटींची संपत्ती आहे. हा आकडा जगाच्या जीडीपीच्या 14 टक्के इतका आहे.

> ऑक्सफॅम इंटरनॅशनलच्या अहवालात आहे काय?

श्रीमंत आणखी श्रीमंत झाले:  कोरोना महासाथीनंतर  जगभरात अब्जाधीशांच्या संख्येत 573 जणांची भर पडली. म्हणजेच जवळपास दर 30 तासामध्ये एका अब्जाधीशाची भर पडली. या अब्जाधीशांच्या संपत्तीत महासाथीच्या काळात 42 टक्के म्हणजेच 293.16 लाख कोटींची भर पडली. जगातील 3.1 अब्ज लोकसंख्येकडे असलेली संपत्ती जगातील सर्वोच्च 10 अब्जाधीशांकडे आहे.

गरीब आणखी गरीब झाले: कोरोना महासाथीच्या काळात 99 टक्के लोकांच्या कमाईत घट झाली आहे. वर्ष 2021 मध्ये 12.5 कोटींहून अधिकजण बेरोजगार झालेत. वर्ष 2021 मध्ये 40 टक्के लोकांच्या उत्पन्नात घट झाली. महासाथ सुरू होण्याआधी 6.7 टक्के लोकांच्या कमाईत घट होत होती.

कंपन्यांचे उत्पन्न वाढले: महासाथीच्या काळात फार्मा उद्योगाशी संबंधित 40 जण अब्जाधीश झाले. मॉडर्ना आणि फायजरसारख्या कंपन्यांनी प्रति सेकंदाला 1 हजार डॉलरचा नफा कमावला. फार्मा कंपन्यांनी सरकारकडून जेनरिक उत्पादनासाठी 24 पट अधिक शुल्क घेतले.

बेरोजगार महिलांच्या संख्येत वाढ: महासाथीच्या आधी स्त्री-पुरुष यांच्या वेतनातील भेदभावा संपुष्टात येण्यासाठी 100 वर्ष लागतील असा अंदाज होता. आता मात्र ही शक्यता 136 वर्ष इतकी वाढली आहे. वर्ष 2020 मध्ये पुरुषांपेक्षा महिलांचा रोजगार कमी होण्याची शक्यता 1.4 पट अधिक होती. तर, वर्ष 2019 च्या तुलनेत 2021 नोकरी करणाऱ्या महिलांची संख्या 1.3 कोटीपेक्षा कमी होते. तर, नोकरी करणाऱ्या पुरुषांची संख्या वर्ष 2019 इतकी झाली होती.

गरिबांचे आर्युमान घटणार: श्रीमंत देशातील नागरिकांचे सरासरी दरडोई उत्पन्न गरीब देशांमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या तुलनेत 16 वर्षांनी अधिक आहे. पुरेशी आरोग्य सुविधा न मिळाल्याने दरवर्षी 56 लाख लोकांना प्राण  गमवावे लागत आहे. त्यानुसार, दररोज 15 हजार जणांचा मृत्यू होत आहे.

गरिबीत वाढ होणार 

ऑक्सफॅमच्या अहवालानुसार गेल्या वर्षी खाद्यपदार्थांच्या किमती 33.6 टक्क्यांनी वाढल्या होत्या. यंदाही भावात 23 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. अन्नधान्याच्या किमती वाढल्याने जगात आणखी गरिबी वाढेल. यावर्षी 26.3 कोटी लोक खूप गरीब असतील. त्यानुसार या वर्षी दर 33 तासांनी 1 कोटी लोक गरीब होतील.

श्रीमंत गरीब दरी कशी मिटवणार?

श्रीमंत आणि गरीब यांच्यातील ही दरी कमी करण्यासाठी ऑक्सफॅमने अधिक कर वाढवण्याची सूचना केली आहे. 5 दशलक्ष डॉलर संपत्ती असलेल्या लोकांवर 2 टक्के आणि 50 दशलक्ष डॉलर संपत्ती असलेल्या लोकांवर 3 टक्के कर आकारला जावा. त्याच वेळी, ज्यांच्याकडे 1 अब्ज डॉलरपेक्षा जास्त संपत्ती आहे, त्यांच्यावर 5 टक्के कर आकारला जावा. कर वाढवून, जगातील श्रीमंतांकडून दरवर्षी 2.52 ट्रिलियन डॉलर (रु. 195.44 लाख कोटी) कर येईल, ज्यामुळे जगातील 2.3 अब्ज लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यास मदत होईल, असा दावाही ऑक्सफॅमच्या अहवालात करण्यात आला आहे.

Previous Post

सोन्या-चांदीचा दर वधारला; काय आहेत तुमच्या शहरातील दर?

Next Post

जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात पंचायत राज समिती जिल्हा दौर्‍यावर

संबंधित बातम्या

फूड

मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

by गणेश सावंत
October 1, 2025
देश विदेश

संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

by गणेश सावंत
June 7, 2025
देश विदेश

Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

by गणेश सावंत
May 13, 2025
बीड

कापसाचा भाव पुन्हा उतरला ,कापूस उत्पादक शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी

by गणेश सावंत
February 28, 2023
gold-rate-gold-price-today-25-may
व्यापार

सोन्या-चांदीचा दर वधारला; काय आहेत तुमच्या शहरातील दर?

by beedreporter
May 25, 2022
Next Post
जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात पंचायत राज समिती जिल्हा दौर्‍यावर

जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात पंचायत राज समिती जिल्हा दौर्‍यावर

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?