• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home कटाक्ष

कटाक्ष -दुष्काळवाड्यात अतिरेकी?की व्यवस्थेचा अतिरेक?

by गणेश सावंत
September 24, 2026
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

गणेश सावंत
मराठवाड्याचा दुष्काळवाडा होऊन बसलाय. हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही. मराठवाड्यातल्या कुठल्याही रस्त्याने तुम्ही निघालात तर शेतातले पिक ओरडून सांगेल ‘आम्हाला पाणी द्या’ शेतकर्‍याच्या डोळ्यात तेच पाणी ओसंडून वाहताना दिसेल एवढी भयावह वास्तविकता असताना आमच्या मुख्यमंत्र्यांना मराठवाड्यातल्या दुष्काळी बांधावर नक्षलवादी दिसतायत का? मराठवाड्यातला शेतकरी अतिरेकी आहे का? इथला कष्टकरी प्रशासनाला माओवादी दिसतोय का? हे थेट प्रश्न विचारण्याचे कारण एवढेच, गेल्या दोन दिवसांपासून मुख्यमंत्री मराठवाडा दौर्‍यावर आहेत. ते शेतकर्‍यांच्या शेतातील थेट बांधावर गेले. त्यांचं स्वागत ! परंतू वरील चार फोटो पहा, आणि आम्ही विचारलेले प्रश्न चुकीचे आहेत का? हे स्पष्ट सांगा, शेतकर्‍याच्या बांधावर मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षाहेतू मेटल डिटेक्टर लावल्याचे आम्ही प्रथमच पाहिले. दुसरा फोटो हा हिरवागार बांध दिसतोय. तिसर्‍या फोटोत कठड्याच्या आत शेतकरी दिसतायत. तर चौथ्या फोटोत मुख्यमंत्री उसाचे पाचरट पाहताना दिसतायत. प्रश्न एवढाच, हा भयावह दुष्काळ आहे मग हिरवागार बांध दाखवण्यापेक्षा वस्तूनिष्ठ उद्ध्वस्त झालेलं शेत प्रशासनाने का दाखवला नाहीत, मुख्यमंत्र्यांना कसली भीती? शेतकर्‍यांना कठड्याच्या आत ठेवले गेले. मेटल डिटेक्टरने शेतकर्‍यांची तपासणी केली गेली. ही


 खरच दुष्काळ पाहणी आहे का?
हा प्रश्न याठिकाणी उपस्थित होतो. शेतकर्‍यांच्या शेतात पाऊल ठेवून त्यांची व्यथा ऐकण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस आले खरे, त्यांचं मराठवाड्यात आम्ही स्वागतही करू, पण दुष्काळ पाहणी दौर्‍यादरम्यान हा सुरक्षेच्या नावाखाली केलेला थाटपाट निव्वळ सरकारी इव्हेंट दिसतोय. दुष्काळाने शेतकर्‍यांच्या शेतात तळे गेले, पिके करपले, जमीनी भेगाळल्या, सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, बाजरी हातातून गेले, मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात पडून शेतकरी धाय मोकलून रडला. त्या अजान, निष्पाप, संकटाने व्यापलेला शेतकर्‍यापासून मुख्यमंत्र्यांना काय तो धोका? जागोजागी दोरखंड, कडेकोट सुरक्षा पाहिल्यानंतर हे स्पष्ट होतं, सरकार आणि शेतकरी यांच्यात किती मोठी दरी आहेे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकर्‍यांच्या बांधावर जात असतील, ते पाहणी करणार असतील तर शेतकरी शासन-प्रशासन व्यवस्थेला संशयित का वाटवाा? खरंतर मुख्यमंत्र्यांनी बळीराजाच्या हातात हात द्यायला हवा, परंतु इथे त्या शेतकर्‍यांच्या भोवती सुरक्षा कवचाचे कुंपणे उभे करण्याची वेळ का आली? हे प्रश्न विचारावेच लागतील. या स्वाभिमानी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कसा असावा? तो


अजातशत्रू
नक्कीच असावा. त्याच्या सोबत विरोधकांचे मतभेद असतील, अंतर्गत स्वपक्षियांचे कपटी डाव असतील, तिथे मुख्यमंत्र्यांनी पुरून उरावे परंतु महाराष्ट्राच्या कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, दिनदुबळ्यांसोबत मुख्यमंत्र्यांचे मैत्रीस्तव संबंध असावेत, त्या प्रत्येक व्यक्तीला होय, हा माझा मुख्यमंत्री नाही, तर राजा आहे असे प्रत्येक माणसाला वाटावे. परंतु इथे उलट. विरोधकांना फोडाफोडीतून सरकार गळ्याला लावत आहे. स्वपक्षियांचे कपटी डाव उलटून लावताना त्यांना मलिदा वाटण्यात येत आहे अन् शेतकर्‍यांच्या बांधावर गेल्यानंतर शेतकरी अतिरेकी, नक्षलवादी, माओवादी असल्यागत त्या शेतकर्‍याला तशी वागणूक दिली जात आहे. मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांबाबत या वर्तवणुकीवर लोकांचे मत ते काय होईल. वरील फोटो पाहिल्यानंतर आमच्याच काय कोणाच्याही तळपायाची आग मस्तकाला जाईल. कारण प्रत्येक फोटो बोलका आहे आणि दुष्काळ पाहणीची ती एक फोटोसेशन कहाणी आहे हे ओरडून सांगतोय.
दुष्काळ फोटोसेशनच्या चौकटीत
नसतो. हे दुर्दैवाने आम्हाला सांगावं लागतेय. शेतात सोयाबीन जळाले, कापूस करपला, मूग, उडीद, बाजरी हातातून गेली आणि मुख्यमंत्र्यांच्या हातात उसाचं पाचरट दिसतय. हो उसाची शेतीही उद्ध्वस्त झाली, परंतु खरं दुष्काळी वास्तव कोणी दाखवणार आहे की नाही? दुष्काळाला फोटोसेशनची चौकट नसते. दुष्काळाला हिरवं पडदा लावता येत नाही. दुष्काळ टेबलावर ठेवून पाहता येत नाही. दुेकाळ दोरखंड लावून ठराविक जागेमध्ये उभा करता येत नाही. दुष्काळ हा शेतकर्‍यांच्या भेगाळलेल्या जमीनीत असतो, कोरड्या विहीरीत असतो, जनावरांच्या पाण्याच्या हंबर्ड्यात असतो, तो शेतकर्‍यांच्या डोळ्यात असतो. परंतु तिथे आम्हाला पहायचं नाही, कारण शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाहण्याची हिंमत या सरकारमध्ये नाही. वस्तूस्थिती जाणून घेण्याची अभिलाषा या सरकारमध्ये नाही. कारण गेल्या आठवड्यातच
मंत्र्यांच्या बैठकीत काजू – बदाम
उभ्या महाराष्ट्राने पाहितले. नव्हे नव्हे तर ते काजू-बदाम खाताना मंत्री चित्रीत झाले. त्यावर मंत्र्यांनी म्हटले, अधिकार्‍यांना समजत नाही, कुठे काय ठेवावे. ही दुष्काळी बैठक आहे, आणि त्या दुष्काळी बैठकीत अधिकार्‍यांनी काजू-बदाम आणून ठेवले. आम्ही त्यांना म्हणालो होतो का, काजू-बदाम आणा. टेबलावर होते म्हणून दोन खाल्ले. मंत्र्यांचे हे उत्तर किती समर्पक हे देव जाणो. जर प्रशासनातील अधिकार्‍यांना दुेकाळाचे गांभीर्य नसेल तर तिते शासन म्हणून, सरकार म्हणून आमदारापासून मुख्यमंत्र्यांपर्यंतच्या प्रत्येक लोकप्रतिनिधीने प्रशासनातील अधिकारी जी कोंडी करू पाहत आहेत ती कोंडी फोडण्याचे काम करायला हवे. परंतु काजू-बदाम खाणार्‍या मंत्र्यांपेक्षा मुख्यमंत्रीच जर आपल्याला शेतकर्‍यांपासून धोका आहे म्हणत शेतात मेटल डिटेक्टर लावून शेतीची पाहणी करत असतील तर या सरकारमधील ‘हमाम मे सब नंगे’ नसतील कशावरून. मराठवाडा हा दुष्काळाने अक्षरश: होरपळून गेला हे त्रिवार सत्य समजून घ्या. आज मेटल डिटेक्टर लावलय, उद्या मराठवाड्यात येण्यासाठी देशाची आर्मी घेऊन येणार का?

Previous Post

मराठवाडा जळतोय…. सरकार बोलतंय ! आता शब्द नकोत, पाण्याचा थेंब द्या

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष – चक्रव्यूह

by गणेश सावंत
September 18, 2026
कटाक्ष

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

by गणेश सावंत
August 22, 2026
कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
कटाक्ष

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

by गणेश सावंत
August 19, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
Please login to join discussion

ताज्या बातम्या

कटाक्ष -दुष्काळवाड्यात अतिरेकी?की व्यवस्थेचा अतिरेक?

September 24, 2026

मराठवाडा जळतोय…. सरकार बोलतंय ! आता शब्द नकोत, पाण्याचा थेंब द्या

September 20, 2026

कटाक्ष – चक्रव्यूह

September 18, 2026

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • कटाक्ष -दुष्काळवाड्यात अतिरेकी?की व्यवस्थेचा अतिरेक?
  • मराठवाडा जळतोय…. सरकार बोलतंय ! आता शब्द नकोत, पाण्याचा थेंब द्या
  • कटाक्ष – चक्रव्यूह

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?