बीड (रिपोर्टर) परतीच्या पावसाने शेतकर्याचं आतोनात नुकसान झालेलं असताना राज्य सरकार मात्र गाढ झोपेत आहे. शासनाच्या निषेधार्थ आज काही समाजसेवकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोयाबीन पेटवून निषेध नोंदवला.
जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोयाबीनची होळी करून राज्य सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. या वेळी डॉ. गणेश ढवळे यांच्यासह युनुस चर्हाटकर, रामनाथ खोड, मनोज जाधव, शेख मुबीन, सय्यद आबेद, सानप धनंजय, दत्ता बारगजे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.