बीड (रिपोर्टर) आरोग्य विभागामध्ये अनेक अधिकार्यांच्या बदल्या करून काहींना पदोन्नत्या देण्यात आल्या आहेत. बीड येथील दोन डॉक्टर जिल्हा शल्यचिकित्सक झाले आहेत. यामध्ये डॉ.चिंचोले आणि डॉ. हुबेकर यांचा समावेश आहे.
आरोग्य विभागाने विविध पदावर असलेल्या अधिकार्यांच्या बदल्या केलेल्या आहेत. तर काहींना पदोन्नत्या सुद्धा देण्यात आल्या आहेत. गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिक्षक असलेले डॉ. महादेव चिंचोले हे सीएस झाले. त्यांची धुळे या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली तर जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी असलेले डॉ. अशोक हुबेकर यांची सुद्धा पदोन्नती होऊन ते कोल्हापूर या ठिकाणी जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून नियुक्त झाले आहेत. जिल्ह्यातील दोन अधिकारी सीएस झाले आहेत.