बीड (रिपोर्टर) देशामध्ये मोठ्या प्रमाणात महागाई वाढलेली असताना महागाई आटोक्यात आणण्यात केंद्र सरकारला अद्याप यश आले नाही तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली नोटबंदी पुर्णत: फसली असून या नोटबंदीचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शहरातील विविध चौकात ‘नोटबंदीच्या निर्णयाला श्रध्दांजली’ अशा पद्धतीचे बॅनर लावून गांधीगीरी पद्धतीने अनोखे आंदोलन केले. या बॅनरनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते.
केंद्र सरकारने कुठलाही वादा आठ वर्षात पुर्ण केला नाही. महागाई दुपटीने वाढली आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचं जगणं मुश्किल झालं आहे. इंधन, गॅसचे दर प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. भ्रष्टाचार रोखण्यासाठी केंद्राने नोटबंदीचा निर्णय घेतला हा निर्णय पुर्णत: फसला. नोयबंदीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकासह अन्य ठिकाणी श्रद्धांजलीचे बॅनर लावण्यात आले. सदरील हा अनोख निषेध राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश युवक सचिव के.के. वडमारे यांनी केला. या बॅनरने सर्व नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते. जनतेला ‘अच्छे दिन’ ऐवजी बुरे दिन आल्याचे या बॅनरद्वारे म्हटले आहे.