बीड (रिपोर्टर) महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेची राज्य स्तरीय वार्षिक सभा 27 नोव्हेंबर रोजी दापोली जिल्हा रत्नागिरी येथे या सभेत बीड जिल्ह्याचे सय्यद जावेद अहेमद यांची मराठवाडा विभागीय सचिवपदी एकमताने निवड करण्यात आली.
संघटनेचे राज्य अध्यक्ष एम. ए. गफ्फार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत राज्य कार्यकारिणी सह राज्यभरातून सर्व विभागांच्या विभागीय कार्यकारिणी व तसेच सर्व जिल्ह्याच्या जिल्हा कार्यकारिणी यांना निमंत्रित करण्यात आले होते. राज्यभरातून संघटनेचे जवळपास सर्वच पदाधिकारी या सभेत उपस्थित झालेत. या सभेत बीड जिल्ह्याचे सय्यद जावेद अहेमद यांची मराठवाडा विभागीय सचिव पदी एक मताने निवड करण्यात आली आहे. या निवडीने मराठवाड्यातील संघटनेचे सर्व जिल्हाध्यक्ष, सचिव व सर्व पदाधिकार्यांकडून अभिनंदन होत आहे.