बीड (रिपोर्टर) शहरातील लक्ष्मणनगर भागातील नागरिकांना नगरपालिकेने अद्यापही भूसंपादनाचा मावेजा दिलेला नाही. मावेजासाठी नागरिक आजपासून जिल्हा-धिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करत आहेत.
लक्ष्मणनगर भागातील नागरिकांच्या मावेजाचा प्रश्न गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबीत आहे. मावेजासाठी नागरिकांनी कित्येक वेळा जिल्हा प्रशासनासह नगर-पालिकेकडे तगादा लावला मात्र याची दखल घेत नसली जात असल्याने आजपासून येथील नागरीक आमरण उपोषण करत आहेत. भूमिअभिलेख कार्यालयाने सर्व्हे नंबरमधील संभ्रम दूर करावा, बीड तहसील कार्यालयाने कुळ कायद्याची संचीका द्यावी, नगरपालिकेने भूसंपादन करून मावेजा द्यावा यासह इतर मागण्या नागरिकांच्या आहेत. या वेळी सुनील शेरकर, भास्कर ठोकरे, सय्यद महेबूब, सागराबाई शेरकर, उर्मिला शेरकर, सय्यद मुस्ताक, राजेश शेरकर, गोरख शेरकर, शशीकला, निखिल शेरकर, आदिल शेख सह आदींची उपस्थिती आहे.