आष्टी (रिपोर्टर) बीड आष्टी नगर राष्ट्रीय महामार्गापासून आठ किलोमीटर अंतरावर कपासी मध्ये लावलेल्या शेतात 100 गांजाची झाडांची लागवड केल्याची गोपनीय माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा बीड पोलिसांनी ही कारवाई करून 70 किलो गांजा पकडल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास बाळेवाडी येथे घडली.
आष्टी तालुक्यातील बाळेवाडी येथील हनुमंत अर्जुन पठारे यांने स्वताच्या शेतात कपाशी लावली होती.त्या पिकात गांजाची झाडे लावल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखा बीड पोलिसांना समजाताच त्यानी हि धडाकेबाज कारवाई करत कपाशी शेतात गांजाच्या 100 झाडे लावल्याचे निदर्शनास आले.त्याचे एकुण 70 किलो वजन होते. अंभोरा पोलिस ठाण्यात स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे याच्या फिर्यादीवरून आरोपी हनुमंत अर्जुन पठारे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे, गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक भगतसिंग दुल्लत , एएसआय वचिष्ठ कांगणे,पोलीस हेडकॉन्स्टेबल बाबुराव तांदळे,शिवदास केदार, प्रसाद कदम, सोमनाथ गायकवाड, रामदास तांदळे, विकास वाघमारे,अतुल हराळ,अशोक कदम,यानी केली. आरोपी पसार असून पुढील तपास अंभोरा पोलिस करीत आहेत.
अंभोरा पोलीसांनी अवैध धंदेवाल्यांवर कारवाई करावी, नागरिकांनी केली मागणी
बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना काजाची माहिती मिळते ते स्वतः येऊन कारवाई करतात त्यानंतर अंभोरा पोलिसांना माहिती होते हे आर्चयकारक अंभोरा ठाण्यातील स्थानिक पोलिसांनी वाळू, काजा,मटका, गुटखा असे विविध अवैध धंदे राजरोसपणे सुरू असून यांचावर अशा कारवाई होण्याची आवश्यकता आहे अशी मागणी सर्व सामान्य नागरिकांतून होत आहे.