बीड (रिपोर्टर) स्व. माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथराव मुंडे यांचे खंदे समर्थक तथा भाजपाचे जिल्हा सचिव राजेंद्र बांगर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. आज सकाळी त्यांच्या पार्थीवदेहावर उक्कडपिंप्री येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
राजेंद्र बांगर हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांची काल प्राणज्योत मालवली. आज सकाळी अकरा वाजता गेवराई तालुक्यातील उक्कडपिंप्री या ठिकाणी त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, बहिणी, चुलते, पुतणे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. राजेंद्र बांगर हे स्व. गोपीनाथराव मुंडे यांचे खंदे समर्थक होते. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे ते सर्वपरिचीत होते. त्यांच्या अंत्यविधीला विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, डॉक्टर, वकील, सर्वसामान्य नागरिक उपस्थित होते. बांगर कुटुंबियाच्या दु:खात रिपोर्टर परिवार सहभागी आहे.