अंबाजोगाई (रिपोर्टर)
दगडाने ठेचून एका 22 वर्षीय तरुणाचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना आज रविवारी दि.25 रोजी सकाळी तालुक्यातील चीचखंडी शिवारात उघडकीस आली. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली. अंबाजोगाई ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत.
अर्जुन पंढरी गडदे (वय 22, रा.चीचखंडी) असे मृत तरुणाचे नाव आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अर्जुन शुक्रवारी रात्रीपासून बेपत्ता होता. रविवारी सकाळी चीचखंडी शिवारात रस्त्याच्या बाजूला त्याचा मृतदेह आढळून आला. अर्जुनच्या शरीरावरील घाव पाहता दगडाने चेहर्यावर, डोक्यात मारून आणि गळा आवळून त्याचा खून करण्यात आला आल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी स्वाराती रुग्णालयात पाठवून दिला.तरुणाच्या खुणाचे कारण मात्र समजू शकले नाही. अंबाजोगाई ग्रामीण पोलीस पुढील तपास करत आहेत.