बीड/वडवणी (रिपोर्टर) वडवणी रोडवरील उपळीजवळ एकाचा अपघात होऊन त्यात तो मरण पावला. सदरील हा प्रकार अपघाताचा नसून घातपाताचा असल्याचा आरोप मयताच्या नातेवाईकांनी केला. मयताचे बीडच्या जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी दुपारपर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.
नितीन विठ्ठल नाईकनवरे (वय 32, रा. हिवरगव्हाण ता. वडवणी) याचा उपळी जवळील भरमटेक तांडा परिसरात अपघात झाला. यामध्ये तो मयत झाला. हा अपघात नसून घातपातच असल्याचा आरोप मयताच्या नातेवाईकांनी केला असून या प्रकरणाचा सखोल तपास करावा, अशी मागणी नातेवाईकांकडून करण्यात आली. जिल्हा रुग्णालयामध्ये मयताचे शवविच्छेदन करण्यात आले. मयताच्या डोक्यावर आणि मानेवर वार असल्याचे सांगण्यात आले.