बीड (रिपोर्टर) राष्ट्रीय पातळीवर कायदा पदवी प्रवेशासाठी देश पातळीवर घेतल्या जाणार्या राष्ट्रीय लॉ परीक्षा (क्लॅट) परीक्षेत बीडचा भावेश विनोद ओस्तवाल याला देशात 25 वा रँक मिळाला असून त्याला बंगळूर येथील देशातील अव्वल कायदा विद्यापीठ असलेल्या राष्ट्रीय कायदा विद्यापीठात प्रवेश मिळाला आहे. त्याचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
बीड शहरातील गायनिक डॉक्टर विनोद ओस्तवाल यांचे चिरंजीव भावेश ओस्तवाल हा कायदा अभ्यासाकडे वळला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय पातळीवर कायदा पदवी प्रवेशासाठी देशपातळीवर घेतल्या जाणार्या राष्ट्रीय लॉ परीक्षा (क्लॅट) मध्ये भावेश ओस्तवाल याला देशात 25 वा रँक मिळाला. कायद्याच्या या महत्वपुर्ण परीक्षेमध्ये भावेशला भरघोस यश मिळाल्यानंतर बंगळूर येथील देशातील अव्वल कायदा विद्यापीठ असलेल्या राष्ट्रीय कायदा विद्यापीठामध्ये त्याला प्रवेश मिळाला आहे. त्याच्या यशाबद्दल सर्वस्तरातून अभिनंदन होत असून खासकरून इंडियन मेडिकल असोसिएशन, सिद्धीविनायक परिवार यांनी अभिनंदन केले आहे.