परळी (रिपोर्टर) परळी तालुक्यातील सरफराजपूर येथे लांडग्याने धुमाकूळ घालत सहा शेळ्यांचा फडशा पाडला. यामध्ये सदरील शेळी पालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले. घटनेची माहिती महसूल विभागाला झाल्यानंतर नायब तहसीलदार बाबूराव रुपनर यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला.
परळी तालुक्यातील सरफराजपूर हा बालाघाटाच्या डोंगरपट्ट्यात येणारा भाग आहे. या परिसरात लांडग्यांसह इतर वन्य प्राण्यांचा वावर असतो. काल भारत रामभाऊ घाडगे या पशुपालकाच्या शेळ्यांवर लांडग्याने हल्ला चढवला. त्यामध्ये सहा शेळ्यांचा फडशा पाडला. यात घाडगे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. घटनेची माहिती महसूल विभागाला झाल्यानंतर नायब तहसीलदार बाबूराव रुपनर व वनविभागाने पंचनामा केेला.