बीड (रिपोर्टर) खापर पांगरी येथील भीमराव भोसले यांचे रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थीवदेहावर आज सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. भीमराव भोसले हे सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये अनेक वर्षे कार्यरत होते. ते गेल्या काही वर्षांपुर्वी सेवानिवृत्त झाले होते. भोसले हे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे म्हणून सर्वत्र परिचीत होते. त्यांच्या पश्चात दोन मुलं, एक मुलगी, सुना-नातवंडे असा मोठा परिवार आहे. भोसले कुटुंबियाच्या दु:खात रिपोर्टर परिवार सहभागी आहे.