वडवणी (रिपोर्टर):- वडवणी शहराच्या बाजारातून एकाचे अपहरण करण्यात आले असून पत्नीच्या फिर्यादीवरुन एका व्यक्तीसह दोन अनोळखी व्यक्ती विरोधात पोलीसात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत आधिक माहिती अशी कि,वडवणी शहरात बुधवार यादिवशी आठवडी बाजारात असतो याठिकाणी दुपारी एक वाजाण्याच्या सुमारास रा.लोहा जि.नांदेड येथील रहिवाशी असणारे रामचंद्र लिंबुळे व त्यांच्या पत्नी रेणुका हे दोघे बाजार करत आसताना त्याठिकाणी बालाजी महादेव काळे व इतर दोन अनोळखी व्यक्ती आले आणि (पान 2 वर)
उचलीच्या पैसाचे कारण दाखवून रामचंद्र लिंबुळे यांना चारचाकी गाडीत घेऊन गेले आहेत.म्हणून पत्नी रेणूका रामचंद्र लिंबुळे यांच्या फिर्यादीवरुन वडवणी पोलीसात गु.र.नं.90/2022 कलम 365,34 भांदवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास माजलगांवचे डिवयएसपी जयभाय करत असून आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.