प्रत्येक संकटात तुमचा हा मुलगा उभा आहे, कधीही आवाज द्या – धनंजय मुंडे यांचे परळीकरांना आवाहन , शहरात नगरोत्थान योजनेतून 63.23 कोटी रुपयांच्या 39 रस्ते व नाल्यांच्या कामांचे धनंजय मुंडेंच्या हस्ते भूमिपूजन संपन्न आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत ऋणात राहीन – मुंडेंचे परळीकरांना भावनिक वचन
परळी (दि. 04) – परळी शहरात नगरोत्थान योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात 39 रस्ते व संलग्न नाल्याच्या 63.23 कोटी रुपयांच्या कामांचे आज भूमिपूजन संपन्न होत असून, हे रस्ते व नाल्या करून देणे म्हणजे विकास नाही तर, हे माझे कर्तव्य आहे. इथल्या सामान्य माणसाचे उत्पन्न दुपटीने वाढावे, असे विधायक काम करून दाखवणे हे माझे स्वप्न असून, यासाठी मी व माझे सहकारी प्रामाणिक प्रयत्न करत आहोत, असे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी परळी येथे बोलताना केले आहे. परळी शहरातील अत्यंत महत्वाच्या 39 रस्ते व संलग्न नाली कामांचे धनंजय मुंडे यांच्या हस्ते भूमिपूजन शहरातील विविध भागात शनिवारी सायंकाळी संपन्न झाले, यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी सत्तेत आल्यापासून परळी मतदारसंघात केलेल्या कामांचा उल्लेख करत परळीकरांचे आभार व ऋण व्यक्त केले.
परळी शहरातील नागरिकांनी माझ्यावर कुटुंबातील व्यक्तिप्रमाणे प्रेम केले, माझा प्रत्येक संघर्ष त्यांनी स्वतःचा समजून मला सहकार्य केले, आज त्यांच्या या ऋणातून सत्तेच्या माध्यमातून सेवा करत असलो, तरी मला कधीही उतराई व्हायचे नाही. स्नेह आणि सेवेचे हे व्रत माझ्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत असेच अविरत जोपासायचे आहे, असेही धनंजय मुंडे पुढे बोलताना म्हणाले. परळीतल्या नागरिकांसाठी मी व माझे सहकारी 24 तास उपलब्ध असून, अर्ध्या रात्री कोणत्याही संकटात कोणी आले तर त्यांच्या सेवेत मी तत्पर राहीन, असा शब्द धनंजय मुंडे यांनी यावेळी दिला. शहरात नगरोत्थान योजनेतून भुयारी गटाराचे काम सुरू असून, शहर प्रदूषण, नालीमुक्त व्हावे, रोगराई नष्ट व्हावी यादृष्टीने प्रकल्प हाती घेण्यात आलेला आहे, तो पूर्ण होईपर्यंत काही ठिकाणी रस्त्यांच्या चालू कामांमुळे त्रास सहन करावा लागतो आहे, मात्र हे काम जलदगतीने पूर्ण करून शहरातील साथरोग व नाल्यांवर मात करून शहर सुंदर करावयाचे असल्याने नागरिकांनी थोडा संयम बाळगावा, असे आवाहनही धनंजय मुंडे यांनी केले. परळी मतदारसंघात कोविड काळात सेवधर्म च्या माध्यमातून धनंजय मुंडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या सेवा कार्याचा उल्लेख करत धनंजय मुंडे यांनी आगामी काळात करावयाच्या कामांबद्दल सविस्तर उल्लेख केला. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेतून जलजीवन मिशनचा आधार घेत ग्रामीण भागात 5 कोटी रुपये खर्चून जलकुंभ उभारण्यास मंजुरी व निधी उपलब्ध झाला असल्याचे सांगत धनंजय मुंडे यांनी आगामी काळात शहरात पूर्णवेळ व नियमित पाणी पुरवठा होणार असल्याचे सांगितले. परळी ते अंबाजोगाई रस्ता, परळी शहर बायपास, परळी ते धर्मापुरी रस्ता आदी कामांच्या आढाव्याबाबत धनंजय मुंडे यांनी समाधान व्यक्त करत, परळीकर नागरिकांच्या आयुष्यभर ऋणात राहीन, कधीही उतराई होणार नाही, तर सेवेचे व्रत अखेरच्या श्वासापर्यंत निभावण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहीन, असे अभिवचन परळीकर नागरिकांना दिले. या कार्यक्रमास जिल्हा नियोजन समितीचे सदस्य वाल्मिक अण्णा कराड, रा.कॉ. चे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, दीपक नाना देशमुख, वैजनाथ सोळंके, शिवसेना तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे, प्रा. विनोद जगतकर, माजी उपनगराध्यक्ष अय्युब पठाण, सुरेश अण्णा टाक, रा. कॉ.महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ.संगीताताई तुपसागर, ए जी कन्स्ट्रक्शनचे मोहसीन शेख, नगरसेवक शंकर आडेपवार, विजय भोयटे, संजय फड, श्रीकृष्ण कराड, गोपाळ आंधळे, चेतन सौंदळे, रवींद्र परदेशी, दैवशालाताई नानवटे, सुरेश फड, रमेश भोयटे, अनंत इंगळे, शिल्पाताई मुंडे, नाजेर हुसेन, दत्ताभाऊ सावंत, बापू अरसुले, राजकुमार डाके, सिराज सय्यद, लाला पठाण, जालिंदर नाईकवाडे यांसह विविध आघडीचे पदाधिकारी, नगरसेवक व स्थानिक नागरिक आदी उपस्थित होते.
या कामांचे झाले भूमिपूजन परळी शहरातील एमएसईबी कार्यालय ते वेअर हाऊस पर्यंत सी.सी. रोड, आर.सी.सी. नाली करणे, सर्वे नं.75 ते उखळवेस रोडपर्यंत आर.सी.सी. नाली करणे, आ.क्र.(धनमनादेवी) ते रेल्वे ट्रॅक पर्यंत सी.सी. रोड, आर.सी.सी. नाली करणे, प्रति वैद्यनाथ मंदिर ते वैद्यनाथ मंदिर पार्किंग परिसर सुधारित करणे, प्रति वैद्यनाथ मंदिर परिसर बेलवाडी गुरूलिंग स्वामी मंदिर परिसर पार्किंग पवरिसर सुधारित करणे, कन्याशाळा ते बरकतनगर पर्यंत आर.सी.सी. नाली करणे, गंगासागर नगर ते उखळवेस पर्यंत सी.सी. रोड, आर.सी.सी. नाली करणे, दोस्ती टी हाऊस ते कुचेरिया पर्यंत सी.सी. नली करणे, पंडित दिनदयाळ उद्यान रोड क्र.387 फटाले पेपर मिल ते भंडारे ऑईल मिल पर्यंत सी.सी. रोड, आर.सी.सी. नाली करणे, नांदुरवेस ते मुल्ला गल्ली पर्यंत आर.सी.सी. नाली करणे, आर्य समाज मंदिर ते कत्तलखाना पर्यंत आर.सी.सी. नाली करणे, नुराणी मस्जीद ते राठोड पर्यंत आर.सी.सी. नाली करणे, चांदापूर डोंगरतुकाई रोड ते अंबेवेस पर्यंत सी.सी. रोड, आर.सी.सी. नाली करणे, वैद्यनाथ मंदिर परिसर शनी मंदिर परिसर ते देशमुख स्मशानभुमी परिसर सुधारित करणे, आर.सी.सी. नाली करणे, मोंढा परिसर विभागातील रोड क्र.321 (डुबे हॉस्पिटल ते दडगे यांच्या हॉटेल) पर्यंत सी.सी. रोड, आर.सी.सी. नाली करणे, मोंढा परिसर विभागातील रोड क्र.322 (तोतला सिमेंट दुकान ते लाहोटी) पर्यंत सी.सी. रोड, आर.सी.सी. नाली करणे, मोंढा परिसर विभागातील रोड क्र.324 (रमेश गित्ते ते गडगुळ मेडिकल दुकान) पर्यंत आर.सी.सी. नाली करणे, मोंढा परिसर विभागातील रोड क्र.325 (तांदळे आडत ते मेनकुदळे यांची जुनी आडत) पर्यंत आर.सी.सी. नाली करणे, मोंढा परिसर विभागात रोड क्र.330 सरदार सायकल मार्ट