बीड (रिपोर्टर) विजयवाडा ते नगरसोल या एक्सप्रेस गाडीमध्ये नांदूरघाट दरम्यान एकास पोलिसांनी ताब्यात घेतले असता त्याच्या जवळ दोन मोबाईल आढळून आले. सदरील हा चोरटा असून त्याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
नांदूरघाटच्या दरम्यान रेल्वेच्या डब्यामध्ये प्रदीप शिवाजी शिंदे (वय 30 रा. वापटी ता. वसमत जि. हिंगोली) यास पोलिसांनी ताब्यात घेतले असता त्याच्या जवळ दोन मोबाईल फोन सीमकार्ड नसलेले आढळून आले. या चोरटट्याने गाडीतील प्रवाशांचे मोबाईल चोरले होते. या प्रकरणी त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कावाई एपीआय परमेश्वर सोगे, निरीक्षक मिना, बाबासाहेब फड, पंकज पुरी, पो.कॉ. नवीन यांनी केली आहे. पुढील तपास प्रभारी अधिकारी परमेश्वर सोगे यांच्या आदेशाने अवचार, राजपूत हे करत आहेत.