• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

प्रखर- विकासाचा देखावा

by Beed Reporter
February 14, 2023
Reading Time: 1 min read
0
प्रखर- विकासाचा देखावा
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

एकनाथराव शिंदे, आणि भाजपाचं सुत जुळून आल्यानंतर नवं राजकीय समीकरण जन्माला आलं. मुख्यंमत्री एकनाथराव शिंदे यांची तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली. या दोघांनी पदभार घेतल्यानंतर अनेक बाता मारल्या. कित्येक आश्‍वासने दिली. या आश्‍वासनांची आठवण दोघांना ही नाही. जेव्हा विकासाचे प्रश्‍न समोर येतात. तेव्हा मात्र काही तरी वेगळंच प्रकरण चर्चेत आणलं जातं. त्यामुळे खर्‍या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष केले जात आहे. राज्यात अनेक प्रश्‍न आ वासून उभे आहेत. ह्या सर्व प्रश्‍नांना सोयीनूसार बगल दिली जाते. शेतकर्‍यांचे प्रश्‍न सर्वात महत्वाचे आहेत. ह्या प्रश्‍नांवर कधी विधीमंडळात चर्चा होत नाही. शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर चर्चा करायला लोकप्रतिनिधींना इंट्रेस नसतो. विधीमंडळाच्या बाहेर आल्यांनतर घसा कोरडा पडेपर्यंत शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर बोलले जाते. शेतकरी आत्महत्या यावर उपाय योजना केल्या जात नाहीत. राज्यात 2022 साली 2945 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. त्यात बीड जिल्हयात 220 सर्वाधिक आत्महत्या आहेत. राज्य आत्महत्याग्रस्त होवू लागलं. शासनाच्या शेतकर्‍यासाठी ज्या काही योजना आहेत. त्या निव्वळ बकवास आहेत. या योजनेतून शेतकर्‍याचं कधीच भलं होणार नाही? फक्त नावाला योजना सुरु करण्यात आल्या आहेत. योजनेवर इतके कोटी खर्च होणार, तितके कोटी खर्च होणार असा आकडा सांगितला जातो. त्या आकडयातून शेतकर्‍यांना लाभ मिळतो किती? शेतकर्‍यासाठी ज्या काही योजना सुरु असतात. त्या योजनेमुळे दलाल, आणि भ्रष्ट अधिकारी, कर्मचार्‍याचंच भलं होतं. शेतकरी योजनेपासून उपाशीच राहत आलेला आहे.

अजुन मदत मिळाली नाही
अतिरिक्त पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. पंचनामे करुन अहवाल सरकार दरबारी गेल्यानंतर सरकारने नुकसान भरपाई जाहीर केली. गेल्या सरकारपेक्षा आम्ही किती चांगले आहोत हे दाखवण्यात आले. नुकसान भरपाई जाहीर झाल्यानंतर एक महिन्यात किंवा खुप झाले तर दोन महिन्यात मिळायला हवी. आज चार महिने झाले नुकसान भरपाई जाहीर होवून अजुन शेतकर्‍यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत. नुकसान भरपाईचा लाभ मिळवण्यासाठी शेतकर्‍यांना अनेक अटीतून जावे लागते. फार्म भरुन देण्याचे आदेश महसूल विभागाने दिले. शेतकर्‍यांनी फॉर्म भरुन देवून अनेक दिवस लोटले तरी अद्याप पैसे पडले नाही. नुकसान भरपाई नेमकी मिळणार कधी हाच प्रश्‍न आहे. नुकसान भरपाई जाहीर करत असतांना किती मोठ, मोठया बाता मारल्या गेल्या होत्या. फक्त टाळ्या मिळवण्यापुरत्याच ह्या बाता होत्या का? इतकी दिरंगाई महसुल विभाग लावत असेल तर ही गंभीर बाब आहे. नुकसान भरपाईचं काय झालं याचा आढावा राज्याचा महसूल विभाग का घेत नाही. महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आहेत. त्यांना शेतकर्‍यांना लवकर न्याय द्यावा असं वाटत नाही का? मुख्यमंत्री कधी सार्वजनिक भाषणात अनुदानावर भाष्य करत नाहीत. शेतकर्‍यांना फक्त घुमवायचं हेच शासनाचं विकासाचं धोरण दिसू लागलं?

विमा कंपनी लुटारु?
विमा कंपनीचा मोठा गाजावाजा केला जात होता. विमा कंपनी शेतकर्‍याचं रक्त शोषण करणारी आहे हे आता सिध्द होवू लागलं. विमा भरल्यानंतर नुकसान भरपाईचा फायदा मिळायला हवा., पण बीडला दिलेल्या विमा कंपनीला नुकसान भरपाईचे पैसेच द्यायचे नाहीत. काही शेतकर्‍यांच्या खात्यावर विमाचे पैसे पडले होते, हे पैसे चुकीने पडल्याचे विमा कंपनीने जाहीर करुन शेतकर्‍यांचे बँक खाते होल्ड करण्याचे आदेश बँकांना दिले. असे खाते होल्ड करण्याचा अधिकार नसतांना विमा कंपनीने आदेश दिलेच कसे? यावर शासन काहीच बोलले नाही. याचा अर्थ शासन अणि विमा कंपनी यांच्यात मीलीभगत आहे? शेतकर्‍यांच्या खात्यावर नजर चुकीने कसे काय पैसे पडतील? शेतकर्‍यांनी जो विमा भरला होता, त्याचं काय झालं? विमा कंपनीच्या विरोधात बीड जिल्हयासह राज्यातील काही ठिकाणी आंदोलन झाले. त्याचा परिणाम काहीच झाला नाही. सत्ताधार्‍यांच्या मनात आलं असतं तर ते विमा कंपनीच्या विरोधात कारवाई करु शकले असते. केंद्राने यावर काहीच भुमिका घेतली नाही. मोदी साहेब नेहमीच शेतकर्‍यांचे गोडवे गात असतात. विविध कार्यक्रमातून शेतकर्‍यांशी संवाद साधत असतात. हा फकत देखावा आहे का? त्यांना शेतकर्‍यांची कंपनीकडून होत असलेली लुट मान्य आहे का? अनेक शेतीच्या तज्ञांनी विमा कंपन्याच्या बाबतीत आपली ठोस भुमिका मांडून विमा कंपन्या कशा ‘बंडलबाज’ आहेत यावर प्रकाश टाकलेला आहे. तरी त्यातून काहीच बोध केंद्र आणि राज्य सरकारने घेतला नाही. इथून पुढे कंपनीच्या बाबतीत तितकी विश्‍वासअर्हता दाखवली जाणार नाही. आता पर्यंत विमा भरणार्‍या शेतकर्‍यांची संख्या जास्त असायची. आता शेतकरी तितक्या संख्येने विमा भरतील असं वाटत नाही. कारण कंपनीने शेतकर्‍यांच्या विश्‍वासाचा घात केला आहे.

विस्तार रखडलेला
सत्ता मिळाल्यानंतर ह्या सरकारने अर्धवट मंत्रीमंडळाचा विस्तार केला. दुसर्‍या टप्प्यातील विस्तार कधी होणार याची नेहमीच चर्चा होत असते. त्याचं मुर्हूत ही अंदाजपंजे काढलं जातं, पण विस्तार काही होत नाही. राज्यपाल कोश्यारी नुकतेच पाय उतार झाले, ते त्यांच्या कर्माने गेले. राज्यपाल यांनी आज पर्यंत अधिकच भाजपाची बाजु घेतली, त्यांच्या कार्यावरुन ते राज्यपाल वाटत नव्हते? जणु काही भाजापचे सक्रीय कार्यकर्तेच होते. आज पर्यंत त्यांनी जे काही निर्णय घेतले त्यातील बहुतांश वादग्रस्त ठरले. त्यांचे बोलणे ही चांगले नव्हते. त्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले होते. भाजपाने कधी राज्यपालांच्या विरोधात साधा शब्द काढला नाही. नवीन राज्यपाल आले. त्याचं आताच काही सांगता येत नाही, ते ही भाजपाच्याच पठडीतील आहेत. नवीन राज्यपालांच्या उपस्थित रखलेल्या मंत्रीमंडळाचा विस्तार होईल, पण कधी? अनेक जण मंत्रीपदासासठी गुडघ्याला बाशींग बांधून बसलेले आहेत. त्यातील किती जणांना बाशींग लागेल? न्यायालयाचा निकाल अजुन आला नाही. निकाल शिंदे यांच्या विरोधात गेला तर मग सरकार वाचवणं अवघड होऊ शकतं? पुर्ण मंत्रीमंडळ नसल्यामुळे कामे रखडून पडली आहेत. दोन चाकी सरकार तितकं सक्षमतेने चालत आहे असं मुळीच वाटत नाही. जनतेच्या प्रश्‍नांची ह्या सरकारने तितकी दखल घेतली नाही. आपलं राजकारण कसं जिवंत ठेवायचं आणि समोरच्याला कसा इंगा दाखवायचा हेच राज्याच्या राजकारणात रात्र-दिवस चालत असल्याचे दिसून येवू लागले. राजकारण हे राजकारणापुरते असले पाहिजे. चोवीस तास राजकारण केले तर विकासाचा गाढा पुढे नाही तर मागे जात असतो. राज्याला विकासाची आणि विचाराची परंपरा आहे याचं भान ह्या सरकारने ठेवले पाहिजे.

विरोधकांनी आवाज उठवावा
कधी, कधी विरोधक बेंबीच्या देठापासून ओरड असतात. विरोधकांनी आपली भुमिका इमाने, इतबारे निभवायला हवी. राज्यात सत्तांत्तर झाल्यानंतर विरोधक जरा गप्प गारच आहेत. शिवसेनेकडे विधीमंडळात कुणी बोलायला राहिलं नाही. काँग्रेस पक्षांची मोठी वाताहत झाली. काँग्रेसला बंडखोरीने घेतले. काँग्रेस मधील कोणता नेता कधी भाजपात जाईल हे सांगता येत नाही. तोडजोडीचं राजकारण असल्यावर सत्ताधार्‍यांच्या विरोधात तितका आक्रमपणा दाखवला जात नाही. तांबे कुटूंब यांच्या बाबतीत बरीच चर्चा झाल्यांनतर बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा झाला होता. त्याचं बंड पक्षश्रेष्ठींनी सध्या तरी थंड केला पण भविष्यात काय होईल हे सांगता येत नाही. राष्ट्रवादीची चांगली चलती आहे. ह्या पक्षात बडे, बडे नेते आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला सत्ताधारी थरकू शकतात. मात्र राष्ट्रवादीचे काही नेते ईडी. सीबीआयच्या रडावर असून ते तितका आक्रमपणा दाखवतील का हा प्रश्‍न आहे. शेतकर्‍यांच्या प्रश्‍नी अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी भक्कम बाजु मांडायला हवी. सत्ताधर्‍यांना त्यांच्या आश्‍वासनाची आठवण करुन द्यायला हवी. सरकारने शेतकर्‍यांच्या नावावर राजकारण न करता. शेतकर्‍यांना कसा न्याय देता येईल याचाच प्रयत्न केला पाहिजे. राजकारणात देखावे जास्त काळ टिकत नसतात देखाव्याचे मुखवटे कधी ना कधी गळून पडत असतात.

Previous Post

उभ्या बसवर मोटारसायकल धडकली; वडमाऊलीचा विद्यार्थी जागीच ठार

Next Post

थडगे बांधून विकास कराल तर आमचा त्याला विरोध; शेतकर्‍यांच्या जमीनीचा मोबदला योग्य मिळाला तरच जमीन संपादन करू देऊ -राजू शेट्टी

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
थडगे बांधून विकास कराल तर आमचा त्याला विरोध; शेतकर्‍यांच्या जमीनीचा मोबदला योग्य मिळाला तरच जमीन संपादन करू देऊ -राजू शेट्टी

थडगे बांधून विकास कराल तर आमचा त्याला विरोध; शेतकर्‍यांच्या जमीनीचा मोबदला योग्य मिळाला तरच जमीन संपादन करू देऊ -राजू शेट्टी

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?