• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

अग्रलेख- जातीचे शेतकरी

by Beed Reporter
March 12, 2023
Reading Time: 1 min read
0
विशेष संपादकीय…
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

गणेश सावंत
मो. नं. 9422742810
देशात आणि राज्यात धर्मांधतेचा वळू ज्या पद्धतीने उधळत आहे त्या वळूचे वर केलेले शेपूट पिरगाळणे आता महत्वाचे होऊन बसले आहे. शेतकरी आत्महत्या करतोय, शेतकर्‍यांच्या शेतीमालाला भाव मिळत नाही, त्याला उदरनिर्वाह करणं मुश्किल होवून बसलं आहे. लेकरांना शिकवणं तर सोडाच त्या लेकरांच्या तोंडात दोन घास सुखाचे घालणे शेतकर्‍यांसाठी तारेवरची कसरत होऊन बसली आहे अन् अशा स्थितीत केंद्रातलं सरकार जातीय द्वेष आणि धार्मिक तेढाला अधिक महत्व देतय. केंद्र सरकारचे ध्येय-धोरण हे कष्टकरी शेतकर्‍यांच्या बाजुने असायला हवे, मात्र मंदिर-मस्जिद आणि शहरांचे नामांतरण यावर सर्वसामान्यांना गुंतवून ठेवणार्‍या मोदी सरकारकडून शेतकर्‍यांनी सुगीच्या दिवसाची आशा ठेवणे म्हणजे गाढवा पुढे गिता वाचण्यासारखे म्हणावे लागेल. आज जो हा संताप येतोय तो केवळ आणि केवळ कोण-कुणच्या जातीचा, कुणाचा धर्म कुठला यावर सरकार थेट भाष्य करतय. जो शेतकरी घामाचा रक्त ओकतोय त्या शेतकर्‍याला जातीपेक्षा, धर्मापेक्षा आपल्या पोटाचं आणि कर्तव्य-कर्माचं अधिक महत्व असतं. परंतु याच शेतकर्‍याला तुझी जात कोणती? हे विचारून रासायनिक खते मोफत नव्हे तर चढ्या भावाने देण्याचं धोरण केंद्र सरकारचं जेव्हा समोर येतं तेव्हा सर्वास पोटास लावणे आहे चा नारा देणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र ही जातीय विषवल्ली बहुजनांच्या महाराष्ट्रात उगू देणार नाही. परंतु ज्या पद्धतीने केंद्र सरकार धर्माचं आणि जातीचं ध्रुवीकरण करत सर्वसामान्यांच्या मुलभूत गरजांकडे दुर्लक्ष करतं, त्याविरुद्ध आता स्पष्टपणे व्यक्त व्हायला हवे. शेतकर्‍यांना जात विचारून केंद्र सरकारला नेमकं करायचं काय? शेतकर्‍यांची जात आणि

धर्म हा शेतकरीच
बहुदा राज्यकर्ते मोदींना आणि त्यांच्या बगलबच्च्यांना शेतकर्‍यांचा धर्म आणि जात माहित नसावी. शेतकर्‍यांची जात आणि धर्म हा कर्तव्य कर्म आहे. साडेतीनशे चारशे वर्षांपुर्वी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी शेतकर्‍यांच्या जातीवर आणि धर्मावर भाष्य करताना तो आपल्या कर्तव्य कर्माशी किती इमानदार असतो हे सांगताना थेट म्हटले आहे,
मढे झाकुनिया करिती पेरणी ! कुणबियाची वाही लवलाहे!!
तयापरी करा स्वहित आपुले ! जयासी फावले नरदेह !!
जेव्हा जून महिना उजडतो, पहिला पाऊस पडतो, पेरणीची लगबग सुरू झालेली असते त्यावेळी शेतकर्‍याच्या घरात एखादा व्यक्ती मयत होतो तेव्हा शेतकरी ते मढं झाकून ठेवतो आणि आधी पेरणीला महत्व देतो. शेतकर्‍यांवर भाष्य करताना, शेतकर्‍यांची जात विचारताना, त्याचा धर्म पुसतांना राज्यकर्त्यांनी त्यांच्या कर्तव्य-कर्माकडे लक्ष दिलं असतं तर भलं झालं असतं. शेतकरी नुसता पेरता होत नाही, आपल्या रक्ताचा घाम त्या बिजांच्या मुळाशी घालतो आणि तजेलदार पिक आणून अखंड विश्वासाठी सुगीचे दिवस आणतो. एवढेच नाही तर

धर्म आहे ज्या कुळाचा दो करांनी देत जावे।
शिवाराची होत सुगी पाखरांना तोषवावे॥
असं म्हणत आपला खरा धर्म जगासमोर मांडताना दोन्ही हाताने वाटता कसे येईल आणि शिवारात कणसं फुलली तर ते पाखरांनाही कसे पोसता येईल याकडे लक्ष देतो. शेतकरी तो कुठल्या जातीचा आहे, तु कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या पंथाचा आहे हे पाहण्यापेक्षा शेतकरी ज्या पद्धतीने धर्म आहे ज्या कुळाचा दो करांनी देत जावे, म्हणत मुक्तहस्ते उधळण करतो, त्या उधळणीतल्या दोन टक्क्यात केेंद्र आणि राज्य सरकारने शेतकर्‍यांकडे लक्ष द्यायला हवे. शेतकर्‍यांचा धर्म आणि जात विचारणार्‍या मोदी सरकारने शेतकर्‍यांच्या शेतातील पिकांना भाव मिळतो का?हे खत घेताना विचारलं असतं तर ते अधिक महत्वाचं ठरलं असतं. राजकारणातलं सत्ताकारण करताना

डोक्याचं गहाणखत
करणार्‍या मोदी सरकारच्या मंत्र्यांची अन् त्यांच्या पिलावळांची खरच आता किव करावीशी वाटते. 2013 साली खताचे असणारे भाव आणि 2023 साली रासायनिक खतांचे भाव पाहितले तर मोदी सरकारने शेतकर्‍यांच्या माथी किती अवहेलना दिल्या ते लक्षात येईल. 2013 चे शेतीमाल भाव आणि 2023 चे शेतीमाल भावासह शेतातली मजुरी पाहितली तर शेतकरी आजही आतबट्याचा व्यवहार करतो मात्र अशा वेळी तो कुठल्या जातीचा अथवा धर्माचा म्हणून त्या आतबट्ट्याच्या व्यवहाराकडे पाहत नाही तर ते कर्तव्य-कर्म आहे असे समजूनच पेरता होतो. परंतु जातीयवादाच्या आणि धर्मांधतेच्या डोक्यामध्ये जेव्हा अळ्या वळवळ करतात, व्यवस्था जेव्हा त्या अळ्यांची साठवणूक करून आपल्या सडक्या मेंदूतून थेट शेतकर्‍यांच्या जातीवर आणि धर्मावर बोट ठेवते तेव्हा मात्र संतापाचा कडेलोट होतो आणि या कडेलोटातून मऊ मेनाहून आम्ही विष्णूदास

कठीण वज्रास भेदू
भले तरी देवो कासेची लंगोटी !
नाथाळाच्या माथी हाणू काठी !!
म्हणत शेतकरी व्यवस्थेला आव्हान देईल. तेव्हा व्यवस्थेची पळताभुई थोडी होईल. आम्हाला आश्चर्य याचं वाटतं, एकीकडे कांद्याला भाव नाही शेतकर्‍याचा कापूस घरामध्ये भावाविना पडून आहे, सोयाबीनची अवस्था भिकारचोट होऊन बसली आहे आणि अशा स्थितीत शेतकर्‍यांना सावरण्यापेक्षा शेतकर्‍यांना जात आणि धर्म विचारून मोदी सरकार ज्या पद्धतीने जाती-पातीचे उच्चाटन करण्यापेक्षा धर्मांधतेला प्रोत्साहन देते अशा वेळी जो शेतकरी काळ्या आईच्या उदरातून कणिस पिकवू शकतो, काळ्या आईची छाती फाडून आपल्या घामाने आणि अश्रूंच्या पाण्याने पिक उभारू शकतो तो शेतकरी जेव्हा हातात रुमणं घेईल, आज जरी तो मेनाहून मऊ दिसत असला तरी त्याच्या शक्तीची, त्याच्या सहनशिलतेचा अंत जेव्हा संपुष्टात येईल त्या वेळेस तो व्यवस्थेच्या मस्तकात काठ्या घातल्याशिवाय राहणार नाही. राजकारण आणि सत्ताकारण करताना रयत सुखी झाली पाहिजे, प्रजेचं राज्य आहे आणि त्या जनतेच्या राज्यात शेतकरी सुखावलेला आहे या भूमिकेत राज्यकर्त्यांनी काम करायला हवे, मात्र असे काम न करता जेव्हा राज्यकर्तेच जातीचे आणि धर्माचे भांडवल आपल्या सत्ताकारणाच्या गणितात जुळवतात तेव्हा अशा राज्यकर्त्यांना जातीची शिंदळ तिला कोण कैसे वळी, आप घर ना बापघर । चिंती मनीं व्याभिचार!! असेच म्हणावे लागेल. एखादी शिंदळ बाई असते तिला व्याभिचार करू नको म्हणून कितीही सांगितलं तरी ती बापाच्या घरी असो अथवा नवर्‍याच्या घरी असो किवा नवर्‍याच्याच शेजेवर झोपलेली असो तिच्या मनी जसा परपुरुषाचा विचार असतो तसाच राज्यकर्ते भाजपाच्या मनी शेतकरी मरो अथवा जगो सत्ताकारणाचे गणित कायम असते. असेच हे
तट्टाच्या जातीचे
राज्यकर्ते तर नव्हे! असा संशय आता यांच्या शेतकर्‍यांबाबतच्या धोरणावरून दिसून येतो. तुकोबांचे बंधू यांनी आपल्या एका अभंगात अशा लोकांबाबत म्हटले आहे……
तट्टाचे जातीला नाहीं भीड भार । लाता मारी थोर लहान नेणे ॥1॥
परी तो त्या विशेष मनुष्य होऊन । करी खंड मान वडिलांचा ॥ध्रु.॥
बेरसा गाढव माय ना बहीण । भुंके चवीविण भलतें चि ॥2॥
तुकयाबंधु म्हणे बोकड मातलें । न विचारी आपुले तोंडीं मुते ॥3॥
या अभंगाचा अर्थ ‘तट्टाच्या जातीला भीड नसते त्यामुळे तो कोणालाही वाटेल त्याला लाथ मारतो कारण लहान-थोर हे त्याला काहीच समजत नाही .परंतु विशेष असे की मनुष्य जन्म जरी मिळाला तरी काही मनुष्यांना ज्येष्ठ-श्रेष्ठ समजत नाही आणि समजत नसेल तर तो त्यांची मानखंडना करत असतो आणि असे असेल तर तो त्या तट्टा पेक्षाही नीच जातीचा आहे असे समजावे .जर एखादा मनुष्य आपल्या आईला व बहिणीला वाटेल तसे बोलून भुंकत असेल तर तो मनुष्य नाही तो गाढवच आहे असे समजावे. तुकया बंधू कान्होबा म्हणतात की बोकड माजले तर कोणताही विचार न करता स्वतःच्या तोंडात मुततो.’ अशा व्यवस्थेला हीच भाषा समजते. आज आम्ही ही भाषा केवळ जातीयवाद आणि धर्मांधतेच्या विषवल्लीत जगणार्‍यांबाबत वापरली आणि तेव्हाही संत नामदेव असतील, संत तुकाराम असतील यांनी जातीयवाद आणि धर्मांधतेच्या व्यासात राहणार्‍या लोकांबाबत वापरलेली आहे. शेतकर्‍यांना जात विचारत असाल तर त्या शेतकर्‍यांची जात फक्त ‘शेतकरी’ आणि शेतकरी एवढीच आहे. त्याची जात, त्याचा धर्म विचारण्यापेक्षा त्याच्या कर्तव्य कर्माला महत्व देत राज्यकर्त्यांनी शेतीमालाला भाव दिला तर ते अधिक बरं होईल.

Previous Post

मुश्रीफांच्या पत्नी संतापल्या, म्हणाल्या ‘आम्हाला गोळ्या घालून मारून टाका’ हसन मुश्रीफ यांच्या घरावर दुसर्‍यांदा ईडी छापा

Next Post

काँग्रेसची रजनीताई पाटलांवर मोठी जबाबदारी

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
काँग्रेसची रजनीताई पाटलांवर मोठी जबाबदारी

काँग्रेसची रजनीताई पाटलांवर मोठी जबाबदारी

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?