बीड (रिपोर्टर) राज्यसभेच्या खासदार रजनीताई पाटील यांच्यावर काँग्रेसने मोठी जबाबदारी टाकली असून अर्थसंकल्पीय अधिवेशनात रजनीताई पाटील यांची व्हिप म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर उत्तर प्रदेशातील ज्येष्ठ नेते प्रमोद तिवारी यांची राज्यसभेतील उपनेतेपदी निवड करण्यात आल्याबाबतचे ट्विट जयराम महेश यांनी केले आहे.
याबाबत अधिक असे की, मागील काही दिवसांपूर्वी अधिवेशना दरम्यान खा. रजनीताई पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. आता काँग्रेसने रजनीताई पाटील यांना महत्वाची जबाबदारी दिली असून त्या राज्यसभेत व्हिप म्हणून नियुक्त करण्यात आल्या आहेत. जयराम महेश यांनी याबाबतची माहिती ट्विट करून दिली आहे. त्या आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, काँग्रेस संसदेच्या प्रमुख सोनिया गांधी यांनी प्रमोद तिवारी यांची राज्यसभेतील उपनेतेपदी आणि रजनीताई पाटील यांची व्हिपपदी नियुक्तीला मान्यता दिली आहे, राज्य सभेचे अध्यक्ष जगदीप धनकर यांना या नियुक्त्यांची माहिती देण्यात आली आहे. र्कांग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे हे पक्षाचे अध्यक्ष म्हणजेच राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. आनंद शर्मा यांचा राज्यसभेचा कार्यकाळ गेल्या वर्षी संपल्याने पक्षाकडे उपनेतेपद नव्हते. त्यामुळे आता उत्तर प्रदेशचे प्रमोद तिवारी यांची उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते राजस्थानचे राज्यसभा सदस्य आहेत. महाराष्ट्र बीडच्या असलेल्या रजनीताई पाटील या त्यांच्याच राज्यातून राज्यसभेच्या सदस्या आहेत. 13 मार्चपासून सुरू होणार्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसर्या टप्प्याच्या दोन दिवस आधी काँग्रेसने या नियुक्त्या केल्या आहेत.