बीड, (रिपोर्टर):- बीड शहराच्या काही भागासह जिल्ह्यातील 11 तालुक्याच्या ठिकाणी नविन शासकीय रूग्णालय तपासणी केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठीच्या वैद्यकीय अधिकारी आणि परिचारीकेच्या भरती प्रक्रियेची मुलाखती घेण्याची प्रक्रिया जिल्हा परिषदमध्ये सुरू आहे.
बीड शहरात 6, धारूर 1, वडवणी 1, आष्टी 1, शिरूर 1, परळी 4, माजलगाव 3 अशा स्वरूपामध्ये ही दवाखाना रूग्णालय उपकेंद्रे सुरू करण्यात येणार आहे. याठिकाणी 1 वैद्यकीय अधिकारी, 1 परिचारीका, आणि 1 शिपाई अशा तीन लोकांचा कर्मचारी वर्ग या दवाखान्यात सुरू करण्यात येणार आहे. बीड शहराच्या विविध भागामध्ये ही शासकीय रूग्णालय उपकेंद्रे रूग्णांची तपासणी करण्यात येवुन साध्या आजाराचा औषधोपचार याच ठिकाणी करण्यात येणार आहे तर गंभीर रूग्णांना जिल्हा रूग्णालयामध्ये पाठविण्यात येणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या सयुक्त उपकेंद्राअंतर्गत ही नविन शासकीय रूग्णालये उपकेंद्र सुरू करण्यात येणार आहे. या रुग्णांसाठी एनआरएचएमअंतर्गत कंत्राटी तत्वावर एक वैद्यकीय अधिकारी ज्याची पात्रता एमबीबीएस आहे, असा आणि एक जीएनएम परिचारीका व एक परिचर अशा तीन कर्मचार्यांचा ग्रुप कार्यरत राहणार आहे. कर्मचारी भरती प्रक्रिया झाली की, या दवाखान्याला लवकरच सुरुवात होणार आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांनी दिली.