Tuesday, December 7, 2021
No menu items!
Homeक्राईमबाप-लेकीचे हातपाय बांधुन दरोडेखोरांनी 25 शेळ्या पळवल्या

बाप-लेकीचे हातपाय बांधुन दरोडेखोरांनी 25 शेळ्या पळवल्या


अरणवाडी येथे घडली मध्यरात्री घटना; चोरट्याने दोघांनाही केली मारहाण
धारूर (रिपोर्टर):- धारूर तालुक्यातील अरणवाडी येथे अज्ञात चोरट्याने बापलेकीचे हातपाय बांधुन त्यांना मारहाण करत त्यांच्याकडील लहान मोठ्या 25 शेळ्या चोरून नेल्याची घटना मध्यरात्री अडीच ते तीन वाजण्याच्या दरम्यान घडली. त्या घटनेची माहिती शेजार्‍याने बीड पोलीसांना दिल्यानंतर बीड पोलीसांनी धारूर पोलीसांशी संपर्क साधून घटनेची माहिती कळवली. त्यानुसार धारूर पोलीसांनी पहाटे घटनास्थळी जावून परिस्थितीची पाहणी केली. जखमी बाप आणि लेकीला धारूर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेने धारूर तालुक्यात एकच खळबळ उडाली.


अर्जुन डोंगरे ( वय 80) व त्याची मुलगी कौशल्या अभिमान भालेराव (48 वर्षे) रा.अरणवाडी हे दोघे गावाच्या जवळच राहतात. त्यांच्याकडे लहान मोठ्या 20 ते 25 शेळ्या आहेत. मध्यरात्री अडीच ते तीन वाजण्याच्या दरम्यान 4 चोरट्यांनी येवून या दोन्ही बापलेकीला मारहाण करत त्यांचे हातपाय बांधण्यात आले व त्यांच्याकडील सर्व शेळ्या एका वाहनात घालून चोरून नेल्या. सदरील घटना घडल्यानंतर बाजुला राहणार्‍या एका व्यक्तीच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्या व्यक्तीने बीड पोलीसांशी संपर्क साधला. बीड पोलीसांनी याची माहिती धारूर पोलीसांना दिली. त्यानुसार धारूर पोलीसांनी घटनास्थळी जावून या जखमी बापलेकीला रूग्णालयात दाखल केले. या प्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात धारूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेने धारूर पोलीसात एकच खळबळ उडाली असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!