बीड (रिपोर्टर) बीडहून मुंबईकडे कामानिमित्त जाणारे न.प.चे माजी उपाध्यक्ष शेख शाकेर यांच्या गाडीला कलबोली हायवेवर अपघात झाला. या अपघातात शाकेर बालंबाल बचावले असून ते किरकोळ जखमी झाले. त्यांच्या सोबत अन्य दोघे जण होते. त्यांच्या गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
शेख शाकेर हे स्विफ्ट डिझायर (क्र. एम.एच. 12 एस.एफ. 2129) या गाडीने मुंबईकडे जात होते. कळबोली हायवेवर त्यांच्या गाडीला इर्टिका (क्र. एम.एच. 46 बी.ए. 1983) ने धडक दिली. यात शाकेर हे किरकोळ जखमी झाले असून ते या अपघातातून बालंबाल बचावले. त्यांच्या समवेत अन्य दोघे जण होते. त्यांच्या गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या प्रकरणी मोहम्मद शहेबाज जलालोद्दीन यांनी कामोठी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.