बीड (रिपोर्टर) नियमाचे उल्लंघन करणार्या वाहनधारकांना दंड आकारला जातो. काल सकाळी एका वाहतूक महिला कर्मचार्याने दुचाकीस्वरास बीड बसस्थानकासमोर पकडले होते. योवळी सदरील कर्मचार्याने दंडापोटी 300 रुपये घेतले मात्र 300 रुपयाची पावती दिली नसल्याचा आरोप दुचाकीस्वराने केला आहे.
काल बसस्थानकासमोर एका दुचाकी स्वरास महिला वाहतूक शाखेच्या कर्मचार्याने पकडले होते. नियमाचे उलंघन केले म्हणून दंड द्यावा लागेले असे त्या महिला कर्मचारी समज देतांना म्हणाल्या त्यानुसार वाहनधारकाने तीनशे रुपये दिले मात्र त्या तिनशे रुपयाची पावती दिली नसल्याचे वाहनधारकाचे म्हणने आहे.