नातेवाईकांनी व्यक्त केला खुनाचा संशय; गावातील आरोपी विनयभंगाचा गुन्हा परत घेण्यासाठी
टाकत होते दबाव; गुन्हा दाखल असणार्यांनी बोलावून घेतल्यानंतर प्रभाकर झाला होता बेपत्ता
वडवणी (रिपोर्टर) मौजे चिंचाळा येथील 38 वर्षीय इसमाचा मृतदेह खंडोबा मंदिराजवळ आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. नातेवाईकांनी त्या इसमाच्या मृत्युबाबत घातपाताचा संशय व्यकत केला असून गेल्या दोन महिन्यांपूर्वी सदरच्या मृत व्यक्तीने गावातील दोन ते तीन जणांविरोधात विनयभंग तसेच जिवे मारण्याची धमकी दिली म्हणून वडवणी पोलिसात गुन्हा दाखल केला होता. सदरचा गुन्हा परत घ्यावा यासाठी आरोपी संबंधित व्यक्तीवर दबाव आणून धमक्या देत होते. या प्रकरणीही वडवणी पोलीसात एनसी दाखल करण्यात आली. काल त्याच आरोपींनी मयत इसमास बोलावून घेतल्याचे सांगण्यात येते. काल दुपारपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा आज मृतदेह आढळून आल्याने खुनाचा संशय अधिक बळावत आहे.
प्रभाकर उर्फ बाबु विष्णु पवार अस मृतदेह आढळून आलेल्या इसमाच नाव आहे. तर मृतदेह आढळून आलेल्या इसमाच्या पत्नीने 22 मार्च 2023 रोजी विनयभंग तसेच जिवे मारण्याची धमकी दिली म्हणून गांवातील दोन ते तीन जणांवर वडवणी पोलीसात गुन्हा दाखल केला होता.सदरील गुन्हा मागे घ्या असे आरोपी वारंवार म्हणत त्रास होत असल्याने पुन्हा प्रभाकर पवार यांनी 2 एप्रिल 2023 रोजी वडवणी पोलीसात एनसी दाखल केली होती. तर काल दुपारी प्रभाकर पवार हे खंडोबा मंदिरात मंडप लावाण्याच काम करत असताना दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातील आरोपीनी बोलवले आणि काल दुपार पासुन प्रभाकर उर्फ बाबु विष्णु पवार वय 38 वर्ष हे गायब झाले ते रात्री देखील घरी आले नाहीत म्हणुन घरातील मंडळी त्यांचा सर्वत्र शोध घेत होते.तर आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास प्रभाकर पवार यांचा खंडोबा मंदिरा शेजारी मृत अवस्थेत मृतदेह आढळून आला अशी माहिती नातेवाईकांनी दिली असून या प्रकरणी गांवात एकच खळबळ उडाली आहे. आज सकाळी 10.30मि.वडवणी पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करुन पंचनामा करत मृतदेह कुप्पा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पाठवण्यात आला आहे. तर त्याने व त्यांच्या पत्नीने गुन्हा दाखल केलेल्या आरोपीनीच घातपात घडवून आणला आहे. तेच या प्रकरणातील आरोपी आहेत.असा आरोपी देखील केला आहे.तर प्रकरणात कोणकोणते गुन्हे दाखल होतात हे दुपार नंतर स्पष्ट होईल.तर मृतदेह आढळून आलेल्या इसमाला पत्नी, एक मुलगा आणि मुलगी,आई-वडिल असा परिवार आहे.अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे.