Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडजिल्हाधिकारी जगताप रूजू

जिल्हाधिकारी जगताप रूजू

बीड (रिपोर्टर):- एक महिन्याच्या दीर्घ मुदतीच्या रजेवर गेलेले जिल्हाधिकारी रविंद्र जगताप हे परतले असून त्यांनी आज जिल्हाधिकारी पदाचा परत पदभार स्विकारला आहे. वैयक्तिक कारणामुळे गेल्या एक महिनाभरापूर्वी जिल्हाधिकारी रविंद्र जगताप हे रजेवर गेले होते. त्यांचा पदभार अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांच्याकडे होता. जगताप हे रजेवरून परतले असून ते आज रूजू झाले आहेत. त्यामुळे नियमित जिल्हाधिकारी आल्यामुळे प्रशासन गतीने कामाला लागेल. सोबतच कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची आरोग्य व्यवस्थाही व्यवस्थित काम करेल अशी आशा जनतेसोबत प्रशासनाला आहे.

Most Popular

error: Content is protected !!