बीड (रिपोर्टर): उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते संंजय राऊत यांनी सर्व प्रकारची मर्यादा सोडलेली दिसते. माध्यमांसमोर अर्वाच्च भाषेत आणि थुंकण्यासारखे गलिच्छ प्रकार करुन राऊत यांनी महाराष्ट्राच्या राजकिय संस्कृतीला काळीमा फासला आहे. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि खा.श्रीकांत शिंदे यांच्या विषयी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर खा.संजय राऊत माध्यमांसमोरच थुंकण्यासारखा गलिच्छ प्रकार केल्याने शिवसैनिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला असून शिवसेना बीड जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या नेतृत्वाखाली राऊत यांच्या पुतळ्याचे दहन करुन निषेध व्यक्त करण्यात आला.या येड्या संजय राऊतचे करायचे काय? खाली मुंडके वर पाय,संजय राऊत यांना जेलमध्ये पाठवा,पुण्याच्या येरवाडा हॉस्पीटल मध्ये दाखल करुन त्यांचे डोके तपासा अशा प्रकारच्या घोषणा देत शिवसैनिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. दुसरीकडे शिंदे गटाचे दुसरे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्या नेतृत्वातही संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी सचिन मुळूक यांनी संजय राऊत हा बेश्रम माणूस असल्याचे म्हटले. यावेळी माजी जिल्हाप्रमुख चंद्रकांत नवले, युवासेना जिल्हाप्रमुख सुमीत कोळपे, पंचायत.स.सदस्य गुंडीबा नवले, क्रष्णा वांगीकर, देवीसिंह शिंदे राकेश जाधव सह शिवसैनिक उपस्थित होते.
बीड जिल्हा शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी नगरनाका चौकात खा.संजय राऊत यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. संजय राऊत यांना आग्रा येथील मेंटल हॉस्पीटलमध्ये दाखल करा, राऊतांना अरबी समुद्रात बुडवा किंवा शिवसैनिकांच्या हवाली करा अशा घोषणा देवून राऊत यांचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. या आंदोलनात बीड बाजार समितीचे संचालक गणेश बाप्पा उगले, शहरप्रमुख कल्याण कवचट, बीड जिल्हा प्रवक्ते बाळासाहेब मस्के बहिरवाडी विभाग प्रमुख रंजीत कदम, गोवर्धन काशीद, सरपंच रईस भाई शेख,उपसरपंच विकास घोडके, समीर बेग, माजी उपसरपंच पांडुरंग गवते, उपतालुकाप्रमुख देवराव आबा घोडके, विकास गवते, गणेश घोडके, राजाभाऊ नवले,भास्कर सानप, हनुमान जाधव, रमेश कानडे, रमेश शिंदे, नानासाहेब घल्लाळ, पप्पू शिंदे, सचिन जमदाडे, रमेश नवले, बापू नवले, रोहिदास गोरे, सुदर्शन मोरे, बाबू काशीद, प्रकाश काशीद, बंडू इंगळे,नवनाथ वांढरे, दीपक भांबे, विकास नगदे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.