Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeक्राईमभाजपाच्या चित्रा वाघ यांच्या विरुद्ध शिरूरमध्ये गुन्हा

भाजपाच्या चित्रा वाघ यांच्या विरुद्ध शिरूरमध्ये गुन्हा


बीड (रिपोर्टर):- राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्षांच्या विरोधात खोटे आरोप केल्याने भाजपाच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या विरोधात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या 18 जुलै रोजी शिरूर येथे आल्या असता भाजपाच्या पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांसमोर महेबुब शेख यांच्या विरुद्ध बलात्काराचे खोटे आरोप केले. त्याचा व्हिडिओ महेबुब शेख यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी काल शिरूर पोलिसात तक्रार दिल्यानंतर चित्रा वाघ यांच्या विरुद्ध कलम 499, 500 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेश अध्यक्ष महेबुब शेख यांनी शिरूर पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 18 जुलै रोजी भाजपाच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ या शिरूर येथे आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या सोबत भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के हे होते. या वेळी उपस्थित पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांसमोर बोलताना चित्रा वाघ यांनी आपल्यावर बलात्काराचे खोटे आरोप केले. शिरूर येथील जि.प.सदस्य शिवाजी पवार यांच्या निवासस्थानी त्या बोलत होत्या. या वेळी बोलताना शिरूर येथील राष्ट्रवादी युवक प्रदेश अध्यक्ष महेबूब शेख यांनी एका मुलीवर बलात्कार केला व त्यास पोलीस अटक करत नाहीत, पोलिसांनी या प्रकरणी बी समरी कार्यवाहीची घाई केली, असे शब्द उच्चारून माझी बदनामी केली. माझ्याविरुद्ध बलात्कारी असा शब्द उच्चारून बदनामी केली. चित्रा वाघ बोलत असलेली व्हिडिओ क्लिप पत्रकार भरत पानसंबळ व गोकुळ पवार यांनी मला दाखवली. माझ्या मित्राकडून व कार्यकर्त्यांकडून याची विचारणा झाल्याने मला मन:स्ताप झाला. माझी समाजात बदनामी झाली, तो गुन्हा पोलिसांनी तपास करून निकाली काढला आहे, असे असताना चित्रा किशोर वाघ (उपाध्यक्ष, भाजपा, रा. मुंबई) यांनी माझी बदनामी करण्याच्या उद्देशाने माझ्यावर खोटे आरोप करून माझी बदनामी केल्याची फिर्याद दिल्यानंतर या प्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात कलम 499, 500 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!