बीड (रिपोर्टर) नेतृत्व, लोकशाही, प्रशासन आणि शांतताप्रिय समाज निर्माण करण्यासाठी भारताच्या इतिहासामध्ये प्रथमच देशातील दोन हजारपेक्षा अधिक आमदार राष्ट्रीय विधायक संमेलनामध्ये एकत्रित येऊन एकाच व्यासपीठावर विचारविनीमय करणार असल्याची माहिती राष्ट्रीय विधायक संमेलनाच्या संयोजन समितीचे योगेश पाटील यांनी बीड येथी शासकीय विश्रामगृहावर आयोजीत पत्रकार परिषदेत दिली.
पुढे बोलताना पाटील म्हणाले की, पुणे येथील एमआयआयटी स्कूल ऑफ गर्व्हमेंट तर्फे आयोजीत राष्ट्रीय विधायक संमेलन हे मुंबई येथील बीकेसीजीओ सेंटरमध्ये 15 ते 17 जून 2023 या दरम्यान होत आहे. भारतातील सर्व विधानसभा व विधान परिषदेचे अध्यक्ष, सभापती यांच्या सहकार्याने हे संमेलन होत आहे. राष्ट्रनिर्माण, राष्ट्रीय एकात्मता व राष्ट्रीय सर्वांगीन शाश्वत विकास या मध्यवर्ती विचार त्रिसुत्रीचा प्रमुख उद्देश ठेवून संमेलन आयोजीत करण्यात आले. संमेलनाचे उद्घाटन 16 जून रोजी तर समारोप 17 जून रोजी होणार आहे. या संमेलनाला माजी सभापती सुमित्रा महाजन, मिराकुमार, शिवराज पाटील चाकूरकर, मनोहर जोशी, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला हे मार्गदर्शन करणार आहेत. एमआयटी स्कूल व गव्हर्मेंटचे संस्थापक राहूल विश्वनाथ कराड यांच्या विचारचिंतनातून हे राष्ट्रीय विधायक संमेलन होत असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.