Monday, January 24, 2022
No menu items!
Homeबीडघरकुलाच्या हप्त्यासाठी कुटुंबियांचे कलेक्टर कचेरीसमोर आमरण उपोषण

घरकुलाच्या हप्त्यासाठी कुटुंबियांचे कलेक्टर कचेरीसमोर आमरण उपोषण


बीड (रिपोर्टर):- सर्वसामान्य नागरिकांना हक्काचा निवारा मिळावा म्हणून केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने घरकुल वाटप केले जाते. घरकुल मंजूर केल्यानंतर त्याचे हप्ते वेळेवर दिले जात नाहीत. घरकुलाच्या हप्त्यासाठी गायरान जमिनीत राहणार्‍या एका कुटुंबियाचे जिल्हाधिकारी कार्यालया-समोर आमरण उपोषण सुरू आहे.


कविता आप्पाराव पवार रा. वासनवाडी (गायरान) या महिलेस गेल्या काही दिवसांपुर्वी घरकुल मंजूर झाले. घरकुल मंजूर झाल्यानंतर संबंधित कुटुंबियाने स्वखर्चातून वाळु, खडी आणली मात्र या कुटुंबियांना पुढील बांधकामासाठी संबंधित विभागाने पैसे दिले नाही. घरकुलाच्या हप्त्यासाठी पवार कुटुंबियास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसावे लागले. कविता पवारसह त्यांच्या घरातील लहान मुलं व महिलांचे जिल्हाधिकारी कार्यालया-समोर आमरण उपोषण सुरू आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!