एकच वैद्यकीय अधिकारी तोही रजेवर
बीड (रिपोर्टर) जिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांवर उपचार करण्यासाठी फिजीओ थेरपी कक्ष उघडण्यात आला आहे. ज्या रुग्णांना अॅलोपॅथी अंतर्गत उपचार घ्यावयाचे नसेल, फिजीओथेरपीअंतर्गत उपचार घ्यावयाचे आहेत, अशा रुग्णांसाठी ही सेवा असून यासाठी एकाच वैद्यकीय अधिकार्याची नियुक्ती जिल्हा रुग्णालयात करण्यात आली आहे. हे वैद्यकीय अधिकारी रजेवर असले की हा कक्ष पुर्ण बंद असतो आणि त्यामुळे फिजिओथेरपी उपचार घेणार्या रुग्णाची हेळसांड होते.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी फिजिओथेरपी कक्षामध्ये किमान दोन वैद्यकीय अधिकार्यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी रुग्णांतून होत आहे. त्यामुळे एखादा वैद्यकीय अधिकारी रजेवर गेला तर इतर नियुक्त केलेले वैद्यकीय अधिकारी या कक्षात काम करतील आणि रुग्णाची हेळसांड होणार नाही, अशी मागणी या रुग्णातून होत आहे.