Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडओबीसींवर बोलण्याचा ठेका फक्त भुजबळांनीच घेतलाय का? देवेंद्र भाऊ, तुम्ही चर्चेला येणार...

ओबीसींवर बोलण्याचा ठेका फक्त भुजबळांनीच घेतलाय का? देवेंद्र भाऊ, तुम्ही चर्चेला येणार नसाल तर मी तुमच्या मतदारसंघात सभा घेतो -प्रा.हरी नरके


बीड (रिपोर्टर):- ओबीसींच्या प्रश्‍नाबाबत राज्यात फक्त पोटतिडकिने छगन भुजबळच बोलतात, ओबीसींचे इतर नेते का बोलत नाहीत? ते का गप्प आहेत? असा प्रश्‍न उपस्थित करत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खोटारडे आहेत, त्यांच्यामुळेच ओबीसींचं आरक्षण गेलं. मी त्यांना अनेक वेळा आव्हान देतोय, माझ्या सोबत या, चर्चा करा, माझ्या प्रश्‍नाचे उत्तर द्या परंतु ते माझ्याशी नव्हे तर भुजबळांशी चर्चा करू म्हणतायत. आता मी दुसरं आव्हान देतोय, देवेंद्र भाऊ तुम्ही चर्चेला येणार नसाल तर मी तुमच्या मतदारसंघात सभा घेतो आणि तुम्ही किती खोटारडे आहात ते जनतेसह मोदी-शहांना सांगतो, असा आक्रमक पवित्रा आज जेेष्ठ विचारवंत प्रा.हरी नरके यांनी घेतला.
ते बीड येथे आयोजीत समता परिषदेच्या वतीने विभागीय प्रबोधन शिबीरात बोलत होते. पुढे बोलताना हरी नरके म्हणाले की, ओबीसी जागा झाला पाहिजे, ओबीसी आपल्या हक्कासाठी बोलत नाही. ओबीसींच्या प्रश्‍नाबाबत फक्त छगन भुजबळच बोलतात, त्यांनी एकट्यानीच काय ठेका घेतलाय का? सध्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात अनेक ओबीसी मंत्री आहेत ते मात्र आरक्षणासंदर्भात काहीच बोलत नाहीत. सगळं काही भुजबळांनीच करायचं का? असा प्रश्‍न उपस्थित करत, सत्ताधारी पक्षातील काही लोकांचे पाय दोन डगरीवर आहेत. गरज पडली तर भाजपात जावं लागेल, तेव्हा फडणवीसांच्या विरोधात जावून कसं जमेल? नाही तर ईडी मागे आहेच त्यामुळे हे लोक बोलत नाहीत. माजी मुख्यमंत्री आणि आजचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच ओबीसींचं आरक्षण गेल्याचे हरी नरकेंनी या वेळी छाती ठोकपणे सांगितले. फडणवीस हे खोटारडे आहेत, त्यांच्यामुळे ओबीसींचं आरक्षण कसं गेलं हे मी पुराव्यानिशी सांगतो. मी अनेक वेळा फडणवीसांना आव्हान दिलं, अनेक टेलिव्हिजन चॅनेलवरून चॅलेंज केलं. सात वर्षांपासून माझं आव्हान फडणवीसांनी स्वीकारलं नाही. जेव्हा केव्हा त्यांना माझ्याबद्दल बोललं जातं तेव्हा ते बोलतात, ‘हरी नरके विचारवंत आहेत, त्यांचा मी आदर करतो’, परंतु त्यांच्या प्रश्‍नाचं मी उत्तर देऊ शकत नाही. चर्चा करायची तर मी भुजबळांसोबत करेल. फडणवीसांना आज जो ओबीसींचा पुळका आलाय, तो केवळ त्यांच्या मतदारसंघात ७५ टक्के ओबीसी आहेत. ४०-४५ टक्के ओबीसींसोबत तर माझा थेट संबंध विविध कार्यक्रमातून आला आहे. आता मी दुसरं चॅलेंज देतो, ‘देवेंद्र भाऊ, तुम्ही चर्चेला येणार नसाल तर मी तुमच्या मतदारसंघात सभा घेतो, तुम्ही किती खोटारडे आहात हे मी जनतेला आणि मोदी-शहांना सांगतो, भारतीय जनता पार्टी आणि सरकार हे ओबीसींचे विरोधक आहेत, नुकतच केंद्र सरकारने प्रतिभावंत स्त्रियांचं पुस्तक प्रकाशीत केलं आहे, त्या पुस्तकात सावित्रीबाई फुले यांच्यासह अन्य बहुजन प्रतिभावंत स्त्रियांचा उल्लेखही नाही. यावरूनच हे सर्व काही स्पष्ट होतं. असं म्हणत हरी नरके यांनी भाजप आणि संघ विचाराचा बुरखा टराटर फाडला. बीडमध्ये समता परिषदेच्या वतीने विभागीय प्रबोधन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. थोर विचारवंत, प्रा. हरी नरके यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले. या वेळी व्यासपीठावर समता परिषदेचे प्रा. सुभाष राऊत यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!