Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeबीडपावसाची उघडीप, पिके करपू लागली आठ लाख हेक्टरमधील खरिपाचे पिकं धोक्यात

पावसाची उघडीप, पिके करपू लागली आठ लाख हेक्टरमधील खरिपाचे पिकं धोक्यात

बीड (रिपोर्टर)ः-बीड जिल्ह्यातील खरीपाची पिके जोमाने आली मात्र गेल्या दहा बारा दिवसापासून पावसाने उघडीप दिल्याने पिके करपू लागली. हलक्या जमीनीतील सोयाबीन, मका, कापूस, बाजरी, मटकी, भोईमूगाने माना टाकल्या आहेत. पाऊस कधी पडेल याची शेतकरी आतूरतेने वाट पाहत आहे. जिल्ह्यात खरीपाचे क्षेत्र आठ ते साडेआठ लाख हेक्टर इतके असून कापसाचा पेरा चार लाख हेक्टर दरम्यान झाला. तर तिन ते साडे तिन लाख हेक्टर मध्ये सोयाबीनची लागवड करण्यात आली. यंदा सोयाबीनच्या लागवडीत वाढ झाली. इतर क्षेत्रामध्ये बाजरी, मका, मूग, उडीद, तूर इत्यादी पिकांची लागवड करण्यात आली आहे. ज्या शेतकर्‍यांकडे पाणी आहे. ते शेतकरी पिकांना पाणी देवू लागले. मात्र ज्या शेतकर्‍यांना पाणी नाही त्या शेतकर्‍यांची पिके पाण्याअभावी वाळू लागली आहे.

गेल्या दोन वर्षापासून महाराष्ट्रात चांगला पाऊस पडत असल्याने शेती उत्पादनात मोठी भरभराटी निर्माण झाली. यंदा जून महिन्यात चांगला पाऊस पडला. त्यामुळे शेतकर्‍यांनी खरीप पिकाची लागवड केली. पिके चंागली जोमदार आली. सध्या पिकं बहरात असून पावसाने उघडीप दिल्याने शेतकर्‍यात िंचंता व्यक्त केली जावू लागली. जिल्ह्यात खरीपाचे क्षेत्र साडे आठ लाख हेक्टर इतके आहे. कापसाची लागवड जवळपास चार लाख हेक्टर मध्ये झाली. सोयाबीनची लागवड तिन लाख हेक्टर मध्ये झाली असून इतर क्षेत्रामध्ये इतर पिकांची लागवड करण्यात आली. यावर्षी पिक चांगली आली. शेतकर्‍यांनी अंतर्गत मशागत करुन ठेवली.मात्र पाऊस पडत नसल्याने पिकं करपू लागली. हलक्या जमीनीतील बाजरी, मका, तूर, सोयाबीन, मूग, कापूस करपू लागला. ज्या शेतकर्‍यांकडे पाणी आहे. अशा शेतकर्‍यांनी पिकांना पाणी देण्यास सुरूवात केली. जी शेतकरी कोरडवाहू आहे. त्या शेतकर्‍यांतील पिकांना पाण्याची गरज आहे. पाऊस कधी पडेल याची वाट शेतकरी आतूरतेने पाहत आहे.
शेतकरी हा पुर्णतः निर्सगावर अवलंबून आहे. कधी जास्तीचा पाऊस पडतो तर कधी दुष्काळ पडतो यामुळे शेतकरी आर्थीक संकटात सापडतो. यंदा चांगला पाऊस पडल्याने शेतकर्‍यांनी चांगली मेहनत करुन उत्पादन वाढीसाठी शेतीत मोठया प्रमाणात खर्च केला आहे. मात्र पावसाने दडी मारल्याने शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

Most Popular

error: Content is protected !!