बर्हाणपूर येथे घडली घटना, पत्नीची प्रकृती चिंताजनक
बीड (रिपोर्टर)ः- घरगुती वादातून पती पत्नीने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना बर्हाणपूर येथे घडली. दोघांना जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. यात पत्नीची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते. पत्नी आठ महिन्याची गर्भवती आहे.
भारत मोरे वय-24 व लक्ष्मी मोरे वय-20 हे दाम्पत्य हिंगोली जिल्ह्यातील आहे. बर्हाणपूर येथे हे दोघे कामाला आलेले होते. या दोघा पती पत्नीत घरगुती कारणावरुन तिन दिवसापूर्वी वाद निर्माण झाला होता. या वादातून दोघांनी विषारी औषध प्राशन केले.त्यांना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. लक्ष्मी मोरे ही आठ महिन्याची गर्भवती असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते.