परळी (रिपोर्टर): कन्हेरवाडी येथील आत्माराम मुंडे यांचा निर्घृणपणे खून करण्यात आला. या प्रकरणातील आरोपींविरोधात पोलीस ठार्यात गुन्हा दाखल करण्यात आला मात्र आरोपींना अद्यापही अटक करण्यात आलेली नसून त्यांना तात्काळ अटक करण्यात आलेली नाही त्यांना तात्काळ अटक करावी, यासह इतर मागण्यांसाठी आज परळी शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन पोलिस अधिकार्यांसह प्रशासकीय अधिकार्यांना दिले.
आत्माराम निवृत्ती मुंडे यांचा दि. 1-7-2023 रोजी पवन भिरामराव रोडे, महेश नामदेव रोडे या दोघांनी खून केला. घटना घडल्यानंतर सदरील आरोपी फरार झाले आहेत. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिसांनी आरोपींना अद्यापही अटक केलेली नाही, उलट हे आरोपी सोशल मिडियाद्वारे धमकावत असून पोलीस प्रशासनाने तत्काळ आरोपींना जेरबंद करावे, या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा, यासह इतर मागण्यांसाठी आज परळी बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला असून सर्व व्यापार्यांनी आपआपले व्यवहार बंद ठेवले होते. आपल्या मागण्यांचे निवेदन कन्हेरवाडीच्या ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकार्यांना दिले.