केज (रिपोर्टर): कला केंद्रावर काल पोलिसांनी धाड टाकली. या प्रकरणी जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. पक्षाने याची दखल घेत त्यांना पदावरून कार्यमुक्त केले आहे.
काही दिवसांपूर्वीच उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या जिल्हाप्रमुखपदी केज येथील रत्नाकर शिंदे यांची नियुक्ती झाली होती. काल पोलिसांनी उमरी शिवारातील कला केंद्रावर छापा टाकून काही मुलींना ताब्यात घेतले होते. या कला केेंद्राप्रकरणी शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर पक्षाने याची दखल घेत त्यांची जिल्हाप्रमुख-पदावरून हाकालपट्टी केली आहे.