बीड (रिपोर्टर): स्वत:च्या मोबाईलवर भावपुर्ण श्रध्दांजलीचे स्टेटस ठेवून एका 20 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी तालुक्यातील अंदापुरी घाट येथे उघडकीस आली. नेकनूर पोलिसांनी घटनास्थळी जावून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.
शुभम बाळासाहेब जगताप (वय 20) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने रात्री त्याच्या मामाला फोन करून सांगितले होते की, ‘माझा चुलता मला जमीनीच्या वादातून वारंवार त्रास देत आहे’, याच त्रासाला कंटाळून तरुणाने आत्महत्या केली असल्याचे मयत तरुणाच्या मामाने पोलिसांना सागितले. इधक तपास नेकनूर पोलीस करत आहेत.