गेवराई (रिपोर्टर)ः- बांधावर असलेली मोठ मोठी झाडे तोडल्या प्रकरणी शेतकर्यांने तलवाडा पोलीसात तक्रार दिली असून त्याच्या तक्रारीवरुन झाडे तोडणार्यासह शेतमालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भागवत शिवाजी खेत्रे रा.वाहेगांव आमला ता.गेवराई यांची जमीन आमला येथे आहे. ज्ञानेश्वर कारभारी खेत्रे यांनी बांधावर वळण टाकण्यासाठी जेसीबीच्या साहायाने खोदकाम केले. यावेळी भागवत खेत्रे यांच्या शेतात बांधावर असलेले पाच चिंचेची मोठी झाडे, पाच बोरीची झाडे, तिन कडू लिंबाची झाडे तोडली आहे. कुठलाही परवान न घेता वृक्षतोड केल्याप्रकरणी भागवत शिवाजी खेत्रे यांनी जिल्हा वन अधिकारी कार्यलय बीड येथे तक्रार दिली आहे. तसेच तलवाडा पोलीसात झाडे तोडणारे ज्ञानेश्वर कारभारी खेत्रे व नामदेव वसुदेव खेत्रे आणि जेसीबी मालक दत्ता उबाळे, रा.भेंडटाकळी यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.