म्हणाले, सर्वसामान्यांचे प्रश्न आणि जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध
संपादक शेख तय्यब यांच्याशी साधला संवाद
बीड (रिपोर्टर): कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ना. मुंडे काल बीड जिल्ह्यात डेरेदाखल झाले. बीडच्या सीमेपासून हजारोंच्या उपस्थितीत कार्यकर्ते, समर्थक धनंजय मुंडेंचे ठिकठिकाणी स्वागत करत होते. अशा बिझी शेड्युलमध्ये वेळ काढून धनंजय मुंडेंनी काल बीड शहरात आल्यानंतर सायं. दैनिक बीड रिपोर्टर कार्यालयास सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांच्या समवेत माजी आ. अमरसिंह पंडित यांची उपस्थिती होती. ना. मुंडेंचे पुष्पगुच्छ देऊन संपादक शेख तय्यब, कार्यकारी संपादक गणेश सावंत, निवासी संपादक शेख मुबीन यांनी स्वागत केले.
या वेळी ना. धनंजय मुंडे म्हणाले, संकटाच्या काळात जे जे माझे होते ते ते शेवटच्या क्षणापर्यंत माझेच असतील. रिपोर्टर हा सर्वसामान्यांच्या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवत आला आहे. सत्याला आणि कर्माला महत्व देत आला आहे. यापुढे सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी आणि बीड जिल्ह्याच्या सर्वांगीन विकासासाठी रिपोर्टर आणि आपण प्रयत्न करू, या वेळी त्यांनी संपादक शेख तय्यब यांच्याशी काही काळ संवाद साधला. सत्कार स्वीकारून धनंजय मुंडे पुढे परळीकडे रवाना झाले. या वेळी रिपोर्टरचा संपादकीय विभाग शेख मजीद, रमाकांत गायकवाड, गणेश जाधव, वसीम बेग आदी मित्र परिवार उपस्थित होता.