गेवराई (रिपोर्टर) शहरातील एका 55 वर्षीय व्यापार्याने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून सदरील व्यापार्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. मृतदेहाचे रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
बबन साहेबराव कागदे (रा. स्वराज्यनगर, शहागड ता. गेवराई) यांनी आज सकाळी आपल्या घराच्या गच्चीवर जावून विषारी औषध प्राशन केल्याने त्यांना उपचारार्थ बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये आणण्यात आले होते. मात्र तत्पूर्वीच मरण पावले होते. कागदे हे जनावरांचा व्यापार करत होते. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नसले तरी पैशाच्या देवाणघेवाणीतून त्यांनी आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. मृतदेहाचे जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.