पाटोदा (रिपोर्टर): दर्शनासाठी तू नवीन आला आहेस का? इथे पैसे द्यावे लागतात, असे म्हणत भाविकांना मारहाण करत खिशातील पैसे व फोन पे वरून 5 हजार रुपये बळजबरीने घेतल्याची घटना काल सौताडा येथील रामेश्वर मंदिराजवळ घडली.
या प्रकरणी पाटोदा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. रविंद्र अर्जुन ढाकणे (रा. घाटशीळ पारगाव ता. शिरूर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, काल ते सौताडा येथील रामेश्वर मंदिरात दर्शनासाी गेले हातेे.त यावेळी सचीन वाल्हेकर (रा. देवीगव्हाण, ता. आष्टी) व इतर तीन अनोळखी इसमांनी ‘तू बाहेर गावचा दिसतो, तुला माहीत नाही का इथे आल्यावर पैसे द्यावे लागतात,’ असे म्हणून ढाकण यांच्या खिशातील दीड हजार बळजबरीने काढून घेतले व मारहाण करून त्यांच्या फोन पे वरून पाच हजार रुपये जबरदस्तीने ट्रान्सफर करूएन घेतले. या प्रकरणी पाटोदा पोलिस ठाण्यात रविंद्र ढाकणे यांनी फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून सचीन वाल्हेकरसह अज्ञात तिघा जणांविरुद्ध कलम 392, 34 भा.दं.वि.नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.उपनिरीक्षक पतंगे हे करत आहेत.