बीड (रिपोर्टर) : बीड जिल्ह्यातील थॅलेसिनिया असणार्या रुग्ण नातेवाईकांची मागणी अनेक दिवसांची होती. आम्हाला स्वतंत्र कक्षाची उभारणी जिल्हा रुग्णाण्यात असावी आज जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुरेश साबळे यांच्या विभाग प्रमुख डॉक्टर संजय राऊत यांच्या देखरेखी खाली आज जिल्हा रुग्णालय वॉर्ड 6 मध्ये चार बेडची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली. आता या रुग्णांची हेळसांड नक्कीच थांबणार आणि त्यांना दर्जेदार उपचार मिळणार. जिल्हा रुग्णालयात या रुग्णांसाठी मोफत सुविधा दिली जाते. अशा रुग्णांना नेहमीच रक्त पुरवठा करावा लागतो. त्यांच्यावर उपचार वेळोवेळी ला करावे लागतात त्यासाठी सर्व काही औषध पुरवठा जिल्हा रुग्णालयात उपलब्ध करण्यात आला आहे अशी माहिती डॉक्टर सुरेश साबळे यांनी दिली.
आज बीड जिल्ह्यातील थॅलेसिमिया असणार्या रुग्णांसाठी वार्ड क्रमांक सहा मध्ये स्वतंत्र कक्ष स्थापन करून उद्घाटन करताना. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुरेश साबळे, विभाग प्रमुख डॉक्टर संजय राऊत, डॉक्टर सुधीर राऊत, मेट्रन रमा गिरी, वार्ड ईचार्ज अनिता धांडे, वंदना राजपूत, अनिता खरमाटे, शीला मुंडे, राजश्री कांबळे, माने, वाघमारे मामा आदींची उपस्थिती होती.