बीड । रिपोर्टर
राष्ट्रवादीचे दोन गट पडल्यानंतर बीड जिल्ह्यातील आमदार अजित पवारांच्या गटात सामिल झाले बीडचे एकमेव आमदार संदीप क्षीरसागर हे शरद पवार यांच्यासाबोत राहिले. त्यानंतर आमदार संदिप क्षीरसागर यांची राष्ट्रवादी (शरद पवार गट) जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
आमदार संदिप क्षीरसागर हे पहिल्यापासून शरद पावार यांचे एकनिष्ठ आहेत. राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतरही ते शरद पवार यांच्यासोबत राहुन आपण एकनिष्ठ आसल्याचे दाखवून दिले. या निवडीतून शरद पवार यांनी आपला कारभारी निश्चित केल्याची लोकभावना निर्माण झाली आहे . जिल्हा भरातून संदीप क्षीरसागर यांचे अभिनंदन होत आहे