बीड (रिपोर्टर)ः-गावात वराह सोडण्याच्या कारणावरुन वाद निर्माण झाला होता. या प्रकरणी आरोपी विरोधात 307 नूसार गुन्हा दाखल झालेला आहे. मात्र माजलगांव तालुक्यातील पोलीसांनी आरोपीला अटक केली नाही. आरोपीच्या अटकेसाठी गावकरी जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर आंदोलन करण्यासाठी आले होते. मात्र पोलीसांनी आंदोलन स्थळ जिल्हाधिकारी(पान7 वर…)
कार्यालय आहे त्याठिकाणी आपण आंदोलन करु शकता असे सांगितल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हा पोलीस अधिक्षक यांना दिले. दरम्यान गावकर्यांनी जिल्हा रुग्णालय परिसरातील रस्त्यावर आंदोलन सुरू केले होते.
माजलगांव तालुक्यातील खरात आडगांव येथे वराह सोडण्याच्या कारणावरुन वाद निर्माण झाला होता. यामध्ये राजाभाऊ जाधव, दिनेश जाधव, रोहीदास जाधव, विजय जाधव, विकास जाधव यांनी काही लोकांना मारहाण केली होती. त्यानूसार संबधीतांविरोधात 307 गुन्हा दाखल झालेला आहे. आरोपींना अद्याप अटक झाली नसल्याने गोपाळ शेजुळे, प्रकाश शिंदे, नारायण आढाव, दशरथ आढाव यांच्यासह आदि गावकरी जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर आंदोलन करण्यासाठी आले होते. मात्र या ठिकाणी आंदोलन करता येत नाही असे पोलीसांनी सांगितल्यानंतर आपल्या मागण्याचे निवेदन जिल्हा पोलीस अधिक्षक यांना देण्यात आले.