अजित पवार, सुनिल तटकरेंच्या हस्ते नियुक्तीपत्र
बीड (रिपोर्टर): नांगरी आणि नागरी व्यवस्थेसोबत नाळ जुळवून असलेले राजकारण, समाजकारण आणि विकासाच्या धोरणासोबत सातत्याने पाऊल टाकणारे अॅड. राजेश्वर चव्हाण यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुनर्नियुक्ती केली आहे. राजेश्वर चव्हाण यांच्याकडे अजित पवार यांच्या गटाच्या राष्ट्रवादीची जबाबदारी देण्यात आली असून त्यांच्या निवडीनंतर जिल्ह्यातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला आहे.
राजेश्वर चव्हाण हे नांगरी व्यवस्थेत म्हणजेच ग्रामीण भागातील जनतेत सुपरिचीत अहेत. त्यांनी ग्रामपंचायत ते अन्य स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये सातत्याने घवघवीत यश मिळवून घेतले आहे. ग्रामीण भागातल्या आणि शहरी भागातल्या नागरीकांसोबत त्यांचा चांगला सुसंवाद असून दोन्ही भागातल्या प्रश्नांची त्यांना जाण आहे. पक्षवाढीसाठी राजेश्वर चव्हाण यांचे काम अत्यंत सुकर आणि चांगले असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांची जिल्हाध्यक्षपदावर पुनर्नियुक्ती केली आहे. काल प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते राजेश्वर चव्हाण यांना अध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र देण्यात आले. या वेळी माजी आ. अमरसिंह पंडित, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, परळी विधानसभा अध्यक्ष गोविंदराव देशमुख, शिवाजी सिरसाट, बंडु गिते यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. राजेश्वर चव्हाण यांच्या निवडीनंतर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला.