माजलगाव(रिपोर्टर): माजलगाव तालुक्यातून जाणारा खामगाव ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग जागोजागी उखडला होता. या महामार्गावर दुचाकी वाहने स्लीप होऊन अपघात झाले होते. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे यांनी केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांना रस्ता दुरुस्तीचे निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिला होता. आंदोलनापूर्वीच या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे.
खामगाव तेपंढरपूर हा राष्ट्रीय महामार्ग माजलगाव तालुक्यातून जातो. माजलगाव ते तेलगाव दरम्णयान जागोजागी मोठमोठ्या भेगा पडल्याने यामध्ये दुचाकीचे टायर अडकून अपघात होत होते. यासंदर्भात डॉ. गणेश ढवळे यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत केंद्रिय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देत रस्ता दुरुस्तीची मागणी केली होती. जर हा रस्ता दुरुस्त झाला नाही तर 24 जुलै सोमवारी पात्रूड बसस्थानक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार होते मात्र रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.