Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeबीडमाजलगावन.प.च्या सफाई कामगार महिलांचे थक्कीत वेतना साठी बेमुदत धरणे आंदोलन

न.प.च्या सफाई कामगार महिलांचे थक्कीत वेतना साठी बेमुदत धरणे आंदोलन

माजलगाव (रिपोर्टर):

येथील नगरपरिषदेच्या स्वछता विभागात रोजंदारीवर सफाई कामगार म्हणुन कामावर असलेल्या १८महिलांचे‌ ४महिण्यांचे‌ वेतन न.प.कडे थक्कित असल्याने ते देण्यात ‌यावे म्हणुन‌‌  १६नोव्हेंबर सोमवार रोजी न.प.कार्यालया समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.

याविषयी दिलेल्या निवेदनादात म्हटले आहे की,सदरील मगारांनी यापुर्वी अनेक वेळा निवेदने देऊन ,आंदोलने केली होती मात्र मुख्याअधिकारी यांनी केवळ तोंडी ,लेखी आश्वासने दिली होती पण ऐन दिवाळी सणा निमित्ताने हि काहिच वेतन दिले नाही.   शेवटी २९आक्टोंबर  रोजी निवेदन देण्यात आले होते आणि थक्कित वेतन दिले नाही त्यामुळे ८नोव्हेंबर रोजी धरणे आंदोलन सुरू करण्यात आले होते.  यावर नगराध्यक्ष शेख मंजुर यांनी आश्वासन दिले होते की, दोनच दिवसात वेतन दिले जाईल. पण त्याची पुरतता केलीच नसल्याने  १६नोव्हेंबर रोजी धरणे आंदोलन सुरू केले आहे.  १७नोव्हेंबर असे दोन दिवस झाले  तरीही काहिच दखल घेण्यात आली नाही. रेखाबाई सोनवणे यांच्या नेतृवाखाली केलेल्या धरणे आंदोलनात हौसाबाई डोंगरे ,लक्ष्मीबाई सुतार, कमल शेळके, शाहुबाई टाकणखार, बबीता टाकणखार, सुनंदा सोनवणे,  शाहुबाई सोनपसारे, कुसुम टाकणखार, संजिवनी भालेराव, बबिता पौळ, सुरेखा वाघमारे, मंगल धाईजे ,चंद्रकला शिनगारे, राधाबाई जाधव, संगिता साळवे, ज्योति कांबळे,मुद्रुका पाटोळे या महिलां सह चेतन प्रधान या पुरुष सफाईकामगाराचा समावेश आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!