Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeकोरोनाओमिक्रॉनचा संभाव्य धोका टाळण्यासाठी राधाबिनोद सतर्क, लसीकरणासाठी जिल्हाधिकारी दारोदारी

ओमिक्रॉनचा संभाव्य धोका टाळण्यासाठी राधाबिनोद सतर्क, लसीकरणासाठी जिल्हाधिकारी दारोदारी


मोमीनपुर्‍यातल्या आढाव्यानंतर राधाबिनोद गेवराईत डेरेदाखल
बीड (रिपोर्टर)- ओमिक्रॉनचा संभाव्य धोका लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने काल नियमावली सादर केली असून कोरोनासह नवीन आलेला ओमिक्रॉनचा संभाव्य धोका टाळण्यासाठी लसीकरण महत्वाचे आहे. हेच सांगण्यासाठी आता थेट बीड जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा हे गल्लीबोळात जावुन लसीकरणाचे महत्व सांगण्याबरोबर नागरिकांना लस घेण्यासाठी आवाहन करत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी देवुन आढावा घेत आहेत. आज दस्तुरखुद्द जिल्हाधिकारी शहरातील मोमीनपुरा भागात गेले आणि त्याठिकाणी नागरिकांना लस घेण्याचे आवाहन केले. या वेळी त्यांच्यासोबत उपविभागीय अधिकारी टिळेकर, तहसीलदार डोके यांच्यासह माजी सभापती खुर्शीद आलम हे उपस्थित होते. दरम्यान यानंतर जिल्हाधिकारी यांनी गेवराई शहरासह तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी देवुन तेथील लसीकरणाचा आढावा घेतला.


कोरोनाचा फास कमी होत असताना जगाच्या पाठिवर ओमिक्रॉनचा धोका वाढला. तसे महाराष्ट्रातले महाविकास आघाडी सरकारने राज्यातील जनता ओमिक्रॉनच्या विळख्यात येऊ नये यासाठी आधीच उपाययोजना करायला सुरुवात केली. काल राज्य शासनाने ओमिक्रॉनचा संभाव्य धोका टाळण्यासाठी नियमावली बनवल्यानंतर जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी लसीकरणाची टक्केवारी वाढावी, या उद्देशाने जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसह ग्रामीण रुग्णालयाला भेट देत उपस्थित नागरिकांना लसीकरणाचे महत्व पटवून देणं
सुरू केलं. लसीकरण करणं नितांत गरजेचं असल्याचे सांगत स्वत:सह परिवाराला सुरक्षित ठेवण्यासाठी लस घ्या, असे उपस्थितांना आवाहन केले. आज सकाळी सर्वप्रथम जिल्हाधिकारी हे मोमीनपुरा भागात गेले. या वेळी त्यांच्या सोबत उपविभागीय अधिकारी टिळेकर, तहसीलदार डोके, आरोग्य अधिकारी कासट, डॉ. हाशमी, डॉ. इसाक, माजी सभापती खुर्शीद आलम, हाजी वजीर, हाफेज अशफाक, मोमीन अझहर, प्रा. अमर शेख, शेख जलील, झिशान पठाण, शेख चांद, मोमीन शहेबाज, लतीफ भाई, अलिम सर, राजू भाई, गुलाम रसूल, पठाण समशेर खान, कलीम सर, शेख वाजेद, एस.आय. चांदणे, मुबिन, भालेराव, साबळे, निंबाळकर हे उपस्थित होते. जिल्हाधिकार्‍यांनी शहरातील दौरा संपवल्यानंतर थेट गेवराई गाठली. तेथील ग्रामीण रुग्णालयात लसीकरणाचा आढावा घेत उपस्थित नागरिकांना लसीकरण करून घेण्याबाबत आवाहन केले. या वेळी त्यांच्या समवेत तहसीलदार सचिन खाडे, तालुका आरोग्य अधिकारी संजय कदम यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!