बीड (रिपोर्टर): पैशाच्या देवाण-घेवाणीवरुन झालेल्या वादानंतर एकावर चाकू हल्ला केल्याची घटना 22 जुलै रोजी गेवराई शहरात घडली. या प्रकरणी चौघांवर गेवराई पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
युवराज नवनाथ जाधव (वय 21 वर्षे, रा. केकत पांगरी ता. गेवराई) याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 22 जुलै रोजी मंगेश शिंदे (रा. वाजेदनगर, गेवराई) कृष्णा शिंदे, आकाश शिंदे, किशो शिंदे तिन्ही रा. शिवाजीनगर गेवराई यांनी संगनमत करुन लाथाबुक्यांनी मारहान करत चाकु हंल्ला केला. यात जाधव नामक तरुण जखमी झाला आहे. अधिक तपास पोह. राठोड हे करत आहेत.